‘वारणा’साठी ५८ अर्ज वैध, ३१ अवैध
By admin | Published: April 23, 2015 12:49 AM2015-04-23T00:49:43+5:302015-04-23T00:54:26+5:30
अर्ज अवैध ठरल्याने आता पात्र उमेदारांमधील कोण माघार घेते, कोण रिंगणात राहते याकडे सभासदांचे लक्ष आहे.
पन्हाळा : श्री. तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या ८९ उमेदवारी अर्जांपैकी ३१ अर्ज छाननीमध्ये अपात्र झाले असून ५८ अर्ज वैध ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र खाडे यांनी सांगितले.
अपात्र झालेल्यांपैकी बहुतेक उमेदवार हे शेतकरी संघटनेचे आहेत. साखर कारखान्यास गेल्या पाच वर्षांमध्ये ऊस न घालणे, वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर न राहणे, अशी कारणे असल्याने असल्याने हे अर्ज अपात्र झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. ऊस उत्पादक व्यक्ती सभासदांचे पाच गट असून, त्यात अपात्र झालेले अर्ज पुढीलप्रमाणे : गट १ - १ अपात्र, गट २ - १० अपात्र, गट ३ - १० अपात्र, गट ४ - ५ अपात्र, इतर मागास गट : ४ अपात्र, भटक्या जाती गट : १ अपात्र, असे ३१ अर्ज अपात्र झाले आहेत. आता ५८ अर्ज वैध ठरले आहेत. वैध अर्ज व गट पुढीलप्रमाणे गट १ - ९ पात्र, गट २ - १० पात्र, गट ३ - ४ पात्र, गट ४ - ६ पात्र, गट ५ - १० पात्र, उत्पादक सहकारी संस्था गट - ५ पात्र, महिला गट - ६ पात्र, इतर मागास गट - ४ पात्र, भटक्या विमुक्त जाती गट - २ पात्र, असे ५८ अर्ज पात्र ठरले आहेत. अर्ज माघारीची मुदत ७ मे पर्यंत आहे. स्वाभिमानीचे काही अर्ज अवैध ठरल्याने आता पात्र उमेदारांमधील कोण माघार घेते, कोण रिंगणात राहते याकडे सभासदांचे लक्ष आहे.