बिद्री कारखान्यातर्फे ७५ लाखांची व्याज बिले अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:27 AM2021-09-24T04:27:52+5:302021-09-24T04:27:52+5:30

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून कपात केलेल्या रकमेवर ७५ ...

75 lakh interest bills paid by Bidri factory | बिद्री कारखान्यातर्फे ७५ लाखांची व्याज बिले अदा

बिद्री कारखान्यातर्फे ७५ लाखांची व्याज बिले अदा

googlenewsNext

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून कपात केलेल्या रकमेवर ७५ लाखांचे व्याज बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांनी दिली.

अध्यक्ष पाटील म्हणाले, कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व बिगरसभासद यांच्या ऊस बिलातून ३१ मार्च २०२० अखेर जमा असणाऱ्या रूपांतरित, परतीच्या, पूर्वहंगामी, को-जनरेशन प्रकल्प अशा विविध ठेवीवरील सन २०२०-२१ या हिशेबी वर्षात जमा असणाऱ्या ठेवींवर प्रचलित व्याज दराप्रमाणे होणारी ७५ लाखांची व्याज बिले उत्पादक शेतकऱ्यांच्या संबंधित बँक खात्यावर जमा करण्यात आली आहेत. त्याची उचल करावी, असे आवाहनही अध्यक्ष पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, व्यवस्थापकीय संचालक आर.डी. देसाई, कार्यकारी संचालक के.एस. चौगुले व संचालक मंडळ उपस्थित होते.

...

फोटो

अध्यक्ष के.पी. पाटील

Web Title: 75 lakh interest bills paid by Bidri factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.