८४ दिवसांच्या अटीमुळे लसीकरणाचा वेग मंदावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:27 AM2021-05-25T04:27:38+5:302021-05-25T04:27:38+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत शहरात सोमवारी पाच प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात व सीपीआरमध्ये मिळूण एकूण ३३४ नागरिकांना लसीकरण ...
कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत शहरात सोमवारी पाच प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात व सीपीआरमध्ये मिळूण एकूण ३३४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. नवीन नियमानुसार पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच दुसरा डोस दिला जात असल्याने लसीकरण मोहिमेची गती संथ झाली आहे.
यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे २२, फिरंगाई येथे २५, राजारामपुरी येथे ६, सदर बाजार येथे २५८, सिध्दार्थ नगर येथे ३ व सीपीआर रुग्णालय येथे २० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
शहरामध्ये आजअखेर एक लाख १३ हजार ३८३ नागरिकांना पहिल्या डोसचे तर ४० हजार ४०२ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
आज (मंगळवारी) ४५ वर्षांवरील कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे. याकरिता पात्र नागरिकांना संबंधित प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरुन फोन केला जाणार आहे. त्यांनीच तसेच ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनीच संबंधित लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.