कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करत मंगळवारी त्यांच्याकडून सुमारे ९ लाख १२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यापैकी वाहनधारकांविरोधात कडक मोहीम राबवण्यात आली. दिवसभरात फक्त वाहनधारकांकडून सुमारे चार लाखाचा दंड वसूल करण्यात आला, तर ८०९ वाहने जप्त केली.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना निर्बंध वाढवण्यात आले, त्यामुळे प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी विनामास्क फिरणा-या सुमारे २७४८ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४ लाख ६२ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. त्याशिवाय विनाकारण रस्त्यावर फिरणा-या वाहनधारकांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. त्यामध्ये २६३५ वाहनधारकांकडून सुमारे ३ लाख ९३ हजार ३०० रुपये दंड वसूल केला, त्याशिवाय ८०९ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. अवेळी विनापरवाना अास्थापना सुरू ठेवल्याबद्दल ८८ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ५६ हजार ७०० रुपये दंड वसूल केला.
कोल्हापूर शहरातही मंगळवारी चारही पोलीस ठाणे व शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने चौकाचौकात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवून विनाकारण फिरणा-या वाहनधारकांची अचानक कागदपत्र तपासणी मोहीम घेतली.
फोटो नं. २९०६२०२१-कोल-सीटी ट्रॅफीक ॲक्शन
ओळ : कोल्हापूर शहरात मंगळवारी दिवसभर विनाकारण फिरणा-या वाहनांच्या पोलिसांनी कडक तपासणी केली. यावेळी अनेक वाहने अडवून त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
===Photopath===
290621\29kol_3_29062021_5.jpg
===Caption===
ओळ : कोल्हापूर शहरात मंगळवारी दिवसभर विनाकारण फिरणार्या वाहनांच्या पोलिसांनी कडक तपासणी केली. यावेळी अनेक वाहने आडवून त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.