कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाघबीळ घाटात छोटाहत्ती टेम्पो दरीत कोसळला, एकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 06:23 PM2023-08-08T18:23:45+5:302023-08-08T18:24:49+5:30

सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावरील वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याजवळील उतरणीच्या शेवटच्या वळणावरून छोटाहत्ती टेम्पो दरीत ...

a Tempo fell into the valley at Waghbeel Ghat On the Kolhapur Ratnagiri route, one injured | कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाघबीळ घाटात छोटाहत्ती टेम्पो दरीत कोसळला, एकजण जखमी

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाघबीळ घाटात छोटाहत्ती टेम्पो दरीत कोसळला, एकजण जखमी

googlenewsNext

सरदार चौगुले

पोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याजवळील उतरणीच्या शेवटच्या वळणावरून छोटाहत्ती टेम्पो दरीत कोसळला. ओव्हरटेक करून समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवताना हा अपघात झाला. यात एकजण जखमी झाला. आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.

योगेश ओमप्रकाश राव (वय २८ रा.राजसथान) असे जखमीचे नाव आहे. अपघातात अंदाजे लाख रूपयेचे नुकसान झाले आहे. याबाबतची करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील एक औषध वितरकाचे दुकान आहे. बांबवडे (ता.शाहूवाडी) येथून औषधांचा माल घेऊन छोटा हत्ती गाडी कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाघबीळ घाटातून कोल्हापूरच्या दिशेन जात होता. वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याच्या उतरणीच्या शेवटच्या वळणावर गाडी अली असता, समोर ओव्हटेक करून येणाऱ्या गाडीला चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो पंधरा फूट दरीत कोसळला.

अपघातात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. गाडीतील चालक सतिश देवराज सिंग (वय ४८, रा.उत्तरप्रदेश) यांना आणि  जखमी योगेश राव यांना प्रवाश्यांनी गाडीतून बाहेर काढून उपचारासाठी पाठविले.

Web Title: a Tempo fell into the valley at Waghbeel Ghat On the Kolhapur Ratnagiri route, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.