ठळक मुद्देकोल्हापूर -रत्नागिरी महामार्गावर अपघात एकजण गंभीर जखमीकंटेनर उलटून पहाटे ५ वाजल्यापासून वाहतूक विस्कळीत
मलकापूर : कोल्हापूर -रत्नागिरी महामार्गावर बांबवडे -गोगवे नजीक बारा चाकी कंटेनरची (केए ३२ सी ९५३९ व टँपो७०९ एम एच ० ८ एच १६६८) ची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात राजेंद्र भिमराव चिले (वय ३८ ) हे जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी येथे एकेरी वाहतुक सुरु केली आहे.
हा कंटेनर ( के ए ३२ सी ९५३९ ) आणि टेम्पो (क्रमांक एम एच ०८ एच १६६८) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात राजेंद्र भिमराव चिले (वय ३८) हे जखमी झाले. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी येथे ऐकेरी वाहतुक सुरु केली आहे. महामार्ग वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.दरम्यान, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर गोगावे येथे कंटेनर उलटून पहाटे ५ वाजल्यापासून वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याने सर्व वाहने बांबवडे सरूड मार्गे मलकापूरकडे वळविण्यात आली. यामुळे २५ किलो मिटरचा वळसा घालून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे.
वळसा घालण्यासाठी चार तास जादा वेळ जात आहे. सकाळी साडे नऊनंतर चार तासांनी एकेरी वाहतूक सुरू करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले. दोन्ही बाजूने दीड किलो मिटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शाहूवाडीचे तहसिलदार चंद्रकुमार सानप यांनी घटनास्थळाला भेट दिली.