कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित कृषि वीज पंपाच्या जोडण्या तात्काळ जोडा, आमदार प्रकाश आबिटकर यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:29 PM2017-12-13T15:29:33+5:302017-12-13T15:42:57+5:30
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आॅक्टोंबर २0१७ अखेर अनुक्रमे ८४६२ आणि १५७७५ असे एकूण २४२३७ कृषिपंप जोडण्या पैसे भरुनही प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न आमदार प्रकाश आबिटकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केला.
कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आॅक्टोंबर २0१७ अखेर अनुक्रमे ८४६२ आणि १५७७५ असे एकूण २४२३७ कृषिपंप जोडण्या पैसे भरुनही प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न आमदार प्रकाश आबिटकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केला.
उजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तरामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृषि वीज जोडण्या प्रलंबित असल्याचे मान्य केले. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यामधील गडहिंग्लज विभागामध्ये १८८२, इचलकरंजी विभागामध्ये १६९ जयसिंगपूर विभागामध्ये १९३३ ग्रामीण विभाग १ मध्ये २५७६, ग्रामीण विभाग २ मध्ये २६९२ आणि कोल्हापूर शहरामध्ये १0 असे ८४६२ कृषि पंप जोडण्या प्रलंबित असल्याचे उजार्मंत्र्यांच्या निदर्शनास आणले.
यावेळी उजार्मंत्री म्हणाले, राज्यात प्रलंबित कृषिपंपाना नवीन वीज जोडणी देण्यासाठी आवश्यक निधी उभारुन त्यामधून ही कामे करण्याची कार्यवाही महावितरण कंपनीमार्फत करण्यात येत आहे. सध्यस्थितीमध्ये मीटर उपलब्ध असून शुन्य पोल लागत असलेल्या कृषिपंपाना वीज जोडण्या देण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये सन २0१६-१७ मध्ये अनुक्रमे ८३७६ प ६९३६ कृषिपंपाना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. तसेच या जिल्ह्यामध्ये सन २0१७-१८ मध्ये आॅक्टोबर २0१७ अखेर अनुक्रमे २0३३ व ७१0 कृषि पंपाना वीज जोडण्या देण्यात देण्यात आल्या आहेत व उर्वरीत कृषिपंपाना वीज जोडण्या देण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.