करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजेसाठी सर्व जातीचे पुजारी नेमले जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 04:23 PM2018-06-15T16:23:57+5:302018-06-15T16:23:57+5:30

कोल्हापुरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आता सर्व जातीचे पुजारी नेमण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मंदिर प्रशासन समितीने शुक्रवारी घेतला. 

All the caste priests will be appointed for the worship of Karvirivani Ambani | करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजेसाठी सर्व जातीचे पुजारी नेमले जाणार

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजेसाठी सर्व जातीचे पुजारी नेमले जाणार

Next

कोल्हापूर : कोल्हापुरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आता सर्व जातीचे पुजारी नेमण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मंदिर प्रशासन समितीने शुक्रवारी घेतला. 
श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीसाठी विद्यमान पुजा-यांना प्राधान्य देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. मात्र, त्या निर्णयाकडे पाठ फिरवत एकाही विद्यमान पुजा-याने पगारी नियुक्तीसाठी अर्ज केलेला नाही. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने पुजारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, आलेल्या 117 अर्जांमध्ये 6 महिलांचा समावेश आहे. या अर्जांच्या पार्श्वभूमीवर निवड प्रक्रिया कशी राबवायची यासाठी बुधवारी (दि. 13) मुंबईत बैठक घेण्यात आली. दरम्यान, आज अंबाबाई मंदिरात सर्व जातीचे पुजारी नेमण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.
श्री अंबाबाई मूर्तीला घागरा-चोली नेसवण्याच्या प्रकारानंतर कोल्हापुरात जनआंदोलन झाले आणि त्याची दखल घेत शासनाला मंदिरातील पारंपरिक पुजा-यांचे अधिकार संपुष्टात आणून पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा करावा लागला. दि. २८ मार्चला दोन्ही सभागृहांनी त्यास मंजुरी दिली व दि. १२ एप्रिलला त्याचे गॅझेट झाले. मात्र, शासनाने अद्याप कायद्याची अधिसूचना (प्रसिद्धीकरण) दरम्यान, विधि व न्याय खात्याने देवस्थान समितीलाच स्वतंत्र समिती स्थापन करणे व पगारी पुजारी नियुक्तीची प्रक्रिया करण्यास सांगितले आहे. त्यानुसार समितीकडे आजवर ११७ अर्ज आले असून त्यात ६ अर्ज महिला उमेदवारांचे आहेत.
समितीने केलेल्या अभ्यासानुसार मंदिरात ११ प्रमुख पुजारी व ३५ सहाय्यक पुजारी अशा एकूण ५५ पुजारी व सेवेक-यांची आवश्यकता असल्यामुळे वरिष्ठतेनुसार मंगळवारपासून (दि. १९) तीन दिवस तीन टप्प्यात मुलाखती घेण्यात येणार आहे. त्यासाठी सहा सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यात धार्मिक अभ्यासक गणेश नेर्लेकर, संस्कृत भाषातज्ज्ञ प्रा. शिवदास जाधव, देवस्थानचे सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे व शंकराचार्य पीठाचे प्रतिनिधीचा समावेश आहे. 
 

Web Title: All the caste priests will be appointed for the worship of Karvirivani Ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.