सर्व व्यापाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:17 AM2021-07-01T04:17:55+5:302021-07-01T04:17:55+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे कोल्हापुरातील अत्यावश्यक वगळता इतर सर्व व्यवसाय गेल्या अडीच महिन्यापासून बंद आहेत. मात्र आता शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी ...
कोल्हापूर : कोरोनामुळे कोल्हापुरातील अत्यावश्यक वगळता इतर सर्व व्यवसाय गेल्या अडीच महिन्यापासून बंद आहेत. मात्र आता शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी आपली आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी बुधवारी केले आहे. दरम्यान, संस्थेतर्फे महापालिकेच्या सहकार्याने लक्ष्मी रोडवरील कापड व्यापाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी शिबिर घेण्यात आले.
चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे यापूर्वी अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवेतील जवळपास ४ हजार मालक व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी तसेच ३०० व्यापारी व कुटुंबीयांचे लसीकरण करण्यात आले होते. बुधवारी लक्ष्मी रोडवरील २५० कापड व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी हे शिबिर घेण्यात आले. येथून पुढेही अत्यावश्यक व जीवनावश्यकसह इतर सेवेतील मालक व कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहे.
यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर, परवाना अधीक्षक राम काटकर, संचालक व इलेक्ट्रीकल मर्चंट्सचे अध्यक्ष अजित कोठारी, कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील, ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे संचालक सुरेश लिंबेकर, बालकल्याण संस्थेचे अध्यक्ष नयन प्रसादे, प्रसाद नेवाळकर, गुरुदत्त देसाई, संजय कर्नावट, जुगल माहेश्वरी उपस्थित होते.
--
फोटो नं ३००६२०२१-कोल-चेंबर ऑफ कॉमर्स
ओळ :
कोल्हापूर महापालिका व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे बुधवारी व्यावसायिकांसाठी आरटीपीसीआर चाचणी शिबिर घेण्यात आले.
--