वारकऱ्यांना एस.टीतर्फे फराळाचे वाटप, कोल्हापूर विभागातील अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 03:14 PM2018-07-21T15:14:22+5:302018-07-21T15:35:29+5:30
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविक प्रवांशासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्यावतीने शनिवारी मोफत फराळाच्या वाटप करण्याचा शुभारंभ मध्यवर्ती बसस्थानक शनिवारी सकाळी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्या हस्ते करण्यात आले, या उपक्रमांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
कोल्हापूर : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविक प्रवांशासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्यावतीने शनिवारी मोफत फराळाच्या वाटप करण्याचा शुभारंभ मध्यवर्ती बसस्थानक शनिवारी सकाळी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्या हस्ते करण्यात आले, या उपक्रमांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
पंढरपूर यात्रेसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या जास्त असते. ज्या लोकांना पायी जाता येत नाहीत, त्या भाविकांसाठी एस.टी मोठा आधार असतो. एस.टी.मधून पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविक प्रवांशाचे खूप वर्षांचे जुने नाते आहे. हेच नाते अधिक दृढ करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने अनोखा उपक्रम सुरु केला.
वारीच्या मार्गावर होणाऱ्या गर्दीमुळे प्रवासादरम्यान उशीर होण्याची शक्यता असते. मार्गावर त्यांच्या खाण्या-पिण्याची गैरसोय टाळण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. मध्यवर्ती बसस्थानकांतून सकाळी सजावट केलेल्या २५ एस.टी पंढरपूरकडे अभंगाच्या गजरात रवाना झाल्या.
याप्रसंगी कामगार अधिकारी प्रवीण पाटील, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी संदीप भोसले, आगार व्यवस्थापक अजय पाटील, सहा. वाहतूक अधिक्षक संजय शिंदे, अतुल मोरे, वाहतूक निरिक्षक शितल चिखलव्हाळे,वाहतूक नियंत्रक प्रतिक शिंदे, इफ्रान सांगावकर, यांच्यासह एस.टीचे कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.
सोमवार पर्यंत सुरु राहणार उपक्रम
पंढरपूरकडे जाणाऱ्या भक्तांसाठी बसमध्ये मध्यवर्ती बसस्थानकांतील पुणे पटलाजवळ गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी गाडीतील भाविकांना केळी, दोन राजगिऱ्याचा लाडू व पाण्याची बाटली असा फराळ मोफत दिला जात आहे. यासह एक लहान माहिती पुस्तिका भेट दिली जात होती. त्यामध्ये आरत्यांसह एस. टी.च्या विविध योजना व वेळापत्रकाची माहितीचा समावेश आहे.
प्रवाशांकडून मदत...
एस.टीतील प्रवास म्हणजे त्रासदाय किंवा चालक- वाहक किंवा स्थानकांतील कर्मचाऱ्याकडून प्रवाशांनी मिळणारी वागणूकीमुळे एस.टीकडे बघण्याचा दृष्टीकोन नेहमी वेगळा असतो. मात्र कोल्हापूर विभागाने आज भाविकांना मोफत फारळ वाटत असल्याचे पाहून काही प्रवाशांनी स्वत:हून पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स मदत म्हणून देत,या उपक्रमाचे कौतक केले.
माऊलीच्या दर्शनाच्या ओढीने भाविक तहान - भूक हरपलेले असते. कोल्हापूरहून त्याचा प्रवास पुढे चार ते पाच तासाचा असतो. यासर्व गोष्टीचा विचार करून हा फराळाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांचा शुभारंभ होताच चांगला प्रतिसाद मिळला आहे.
- रोहन पलंगे,
विभाग नियंत्रक