आणि तब्बल बारा दिवसानी आपटाळ प्रकाशमय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:02 PM2020-06-15T17:02:36+5:302020-06-15T17:05:55+5:30
सोसाट्याचा वारा व पाऊस याची तमा न बाळगता खासगी ठेकेदार व विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यतत्परता दाखवून बारा दिवसात आपटाळ (ता . राधानगरी ) गावचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू केला.
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात आपटाळ (ता . राधानगरी ) या गावाला विद्युत पुरवठा करणारे लोखंडी पोल ( खांब )मोडून पडल्याने तब्बल बारा दिवस हे गांव अंधाऱ्या कोठडीचे जीवन जगत होते . या बारा दिवसामध्ये पारिसरात पावसाची संततधार होती. सोसाट्याचा वारा व पाऊस याची तमा न बाळगता खासगी ठेकेदार व विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यतत्परता दाखवून बारा दिवसात आपटाळ (ता . राधानगरी ) गावचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधानाचे वातावरण आहे .
आपटाळ गावाला धामोड येथून केळोशी जंगलातून विद्युत पुरवठा करणारी विद्युत वाहिनी जाते . गेल्या कांही दिवसापूर्वी झालेल्या निसर्ग चक्रि वादळाच्या तडाख्यात यातील सात पोल मोडून पडल्याने ४ जूनपासून गावचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता . त्यानंतर सतत घोंघावणारा वारा व पाऊस ही विद्युत वाहीनी जोडताना अडचण करत होता. पण एका खासगी ठेकेदाराने विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकरवी बारा दिवस मेहनत करून विद्युत पुरवठा सुरू केला . विशेष म्हणजे जंगल परिसरातून जाणारी ही विद्युत वाहिका बदलून ती मुख्य रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आली. त्यामुळे भविष्यात इतका मोठा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागणार नाही .
दरम्यान गावातील विद्युत पुरवठा तब्बल बारा दिवस बंद झाल्याने गावातील सर्वच छोटे उद्योग बंद पडले होते .परिणामी गावातील दैनंदिन चक्रच कोलमडूले . त्यामुळे ऐन पावसाळ्यातील शेतीच्या कामांची धांदल व पिण्याच्या पाण्यापासून ते दळप- कांडप यासाठी द्यावा लागणारा वेळ यांची सांगड घालताना शेतकरी व महिला वर्गाची चांगलीच धावपळ उडाली .
मोडलेले पोल बदलण्याबरोबर लाईनचे शिफ्टींग यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागणार होता . पण विद्युत विभागाचे अधिकारी , कर्मचारी व ठेकेदार यांनी चांगली कार्यतत्परता दाखवत केवळ बारा दिवसात हा खंडीत झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत केला. याबद्दल ग्रामस्थातुन विद्युत मंडळाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले .
निसर्ग चक्रिवादळाच्या टडाख्यात गावचा विद्युत पुरवण खंडीत झाला त्या बद्दल क्षमस्व . पण शेवटी 'निसर्ग ' हा निसर्ग आहे . त्यापुढे आम्ही ही हतबल झालो. पण आमचे कर्मचारी व ठेकेदार यांनी जे कष्ट घेत विद्युत पुरवठा पुर्नवत केला त्यांचेही विशेष आभार .
ए .बी. तंगसाळे
कनिष्ठ अभियंता, शिरगांव सबस्टेशन .
या बारा दिवसात लाईट अभावी गावकऱ्यांचे खुप हाल झाले . ऐन शेतीच्या कामाच्या धावपळीत महिलांची मोठी धावपळ उडाली . पण विद्युत विभागाने वेळाने का असेना विद्युत पुरवठा सुरु केला .आम्ही समाधानी आहोत .
- कृष्णात पाटील,
ग्रामस्थ आपटाळ