श्रीकांत ऱ्हायकरधामोड- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात आपटाळ (ता . राधानगरी ) या गावाला विद्युत पुरवठा करणारे लोखंडी पोल ( खांब )मोडून पडल्याने तब्बल बारा दिवस हे गांव अंधाऱ्या कोठडीचे जीवन जगत होते . या बारा दिवसामध्ये पारिसरात पावसाची संततधार होती. सोसाट्याचा वारा व पाऊस याची तमा न बाळगता खासगी ठेकेदार व विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यतत्परता दाखवून बारा दिवसात आपटाळ (ता . राधानगरी ) गावचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधानाचे वातावरण आहे .आपटाळ गावाला धामोड येथून केळोशी जंगलातून विद्युत पुरवठा करणारी विद्युत वाहिनी जाते . गेल्या कांही दिवसापूर्वी झालेल्या निसर्ग चक्रि वादळाच्या तडाख्यात यातील सात पोल मोडून पडल्याने ४ जूनपासून गावचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता . त्यानंतर सतत घोंघावणारा वारा व पाऊस ही विद्युत वाहीनी जोडताना अडचण करत होता. पण एका खासगी ठेकेदाराने विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकरवी बारा दिवस मेहनत करून विद्युत पुरवठा सुरू केला . विशेष म्हणजे जंगल परिसरातून जाणारी ही विद्युत वाहिका बदलून ती मुख्य रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आली. त्यामुळे भविष्यात इतका मोठा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागणार नाही .दरम्यान गावातील विद्युत पुरवठा तब्बल बारा दिवस बंद झाल्याने गावातील सर्वच छोटे उद्योग बंद पडले होते .परिणामी गावातील दैनंदिन चक्रच कोलमडूले . त्यामुळे ऐन पावसाळ्यातील शेतीच्या कामांची धांदल व पिण्याच्या पाण्यापासून ते दळप- कांडप यासाठी द्यावा लागणारा वेळ यांची सांगड घालताना शेतकरी व महिला वर्गाची चांगलीच धावपळ उडाली .
मोडलेले पोल बदलण्याबरोबर लाईनचे शिफ्टींग यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागणार होता . पण विद्युत विभागाचे अधिकारी , कर्मचारी व ठेकेदार यांनी चांगली कार्यतत्परता दाखवत केवळ बारा दिवसात हा खंडीत झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत केला. याबद्दल ग्रामस्थातुन विद्युत मंडळाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले .
निसर्ग चक्रिवादळाच्या टडाख्यात गावचा विद्युत पुरवण खंडीत झाला त्या बद्दल क्षमस्व . पण शेवटी 'निसर्ग ' हा निसर्ग आहे . त्यापुढे आम्ही ही हतबल झालो. पण आमचे कर्मचारी व ठेकेदार यांनी जे कष्ट घेत विद्युत पुरवठा पुर्नवत केला त्यांचेही विशेष आभार .ए .बी. तंगसाळेकनिष्ठ अभियंता, शिरगांव सबस्टेशन .
या बारा दिवसात लाईट अभावी गावकऱ्यांचे खुप हाल झाले . ऐन शेतीच्या कामाच्या धावपळीत महिलांची मोठी धावपळ उडाली . पण विद्युत विभागाने वेळाने का असेना विद्युत पुरवठा सुरु केला .आम्ही समाधानी आहोत .- कृष्णात पाटील, ग्रामस्थ आपटाळ