ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ, अटकपुर्व जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 04:13 PM2022-04-19T16:13:18+5:302022-04-19T16:32:34+5:30
कोल्हापूर : सरकारी पक्षाला कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी लांबणीवर पडली. त्यामुळे ...
कोल्हापूर : सरकारी पक्षाला कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी लांबणीवर पडली. त्यामुळे ॲड. सदावर्ते यांच्या यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता आहे. प्रथमवर्ग जिल्हा व सत्र न्यायाधिश महेश जाधव यांच्या समोर सुनावणी सुरु आहे. अटकपुर्व जामीन अर्जावर गुरुवारी (दि 21) ला पुढील सुनावणी होत आहे. दरम्यान, सरकार पक्षाला सहकार्य करणेसाठी ॲड. शिवाजीराव राणे यानी दिलेल्या अर्जाला न्यायालयाने मंजुरी दिली.
ॲड. सदावर्ते याच्या अटकेसाठी कोल्हापुरातील शाहुपुरी पोलिसांचे विशेष पथक आज, मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. सकल मराठा क्रांती मोर्चाचे कोल्हापुरातील समन्वयक दिलीप पाटील यांनी ॲड. सदावर्ते याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ॲड. सदावर्ते यांनी विविध मार्गांनी पैसे जमवून ते मराठा आरक्षणविरोधी न्यायालयीन प्रक्रियेसाठी खर्च केले, पण त्याचा हिशेब दिला नसल्याचा पाटील यांनी आरोप करून त्यांच्या सर्व कारभाराच्या चौकशीची मागणी केली आहे.
ॲड. सदावर्तेला आठवड्यापूर्वी सातारा पोलिसांनी अटक केली. सद्या त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सायंकाळी त्यास मुंबईत कारागृहात हलवण्यात आले होते. त्याचा ताब्यात घेण्यासाठी शाहूपुरी पोलिसांचे विशेष पथक काल, सोमवारी रात्री उशिरा मुंबईकडे रवाना झाले होते.