अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा संप कोल्हापुरात सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 05:38 PM2017-09-27T17:38:34+5:302017-09-27T17:43:47+5:30

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांपैकी हजारो सेविका कामावर हजर झाल्या असल्या तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सेविका आणि मदतनीस अजूनही संपावरच असून त्यांना शासनाची मानधनवाढ मान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.

Anganwadi workers, helpers of the helpers in Kolhapur | अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा संप कोल्हापुरात सुरूच

अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा संप कोल्हापुरात सुरूच

Next
ठळक मुद्देअडीच लाख बालके, गरोदर, स्तनदा माता पोषण आहारापासून वंचितअंगणवाडी कर्मचाºयांचा गेले १५ दिवस ‘बेमुदत संप कर्मचारी संपावर गेल्याने पोषण आहाराचे वितरण थांबले संप चिघळण्याची शक्यता

कोल्हापूर, दि. २७ : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांपैकी हजारो सेविका कामावर हजर झाल्या असल्या तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सेविका आणि मदतनीस अजूनही संपावरच असून त्यांना शासनाची मानधनवाढ मान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.


सोमवार (दि. ११)पासून या संपाला सुरुवात झाली असून गावा-गावांतील अंगणवाड्यांचे कामकाज बंद पडले आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी गेले १५ दिवस ‘बेमुदत संप’ पुकारला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ३९२५ सेविका असून ३६९८ मदतनीस आहेत. यापैकी आधी रजेवर गेलेल्या, आजारी असलेल्या वगळल्यास ९९ टक्के कर्मचारी संपावर आहेत. जिल्ह्यातील २ लाख १३ हजार १२४ बालके, १७ हजार ५३५ गरोदर माता, १७७६४ स्तनदा माता आणि शालेय मुलींना पोषण आहार वितरण करण्याची जबाबदारी या कर्मचाºयांवर आहे. मात्र, कर्मचारी संपावर गेल्याने पोषण आहाराचे वितरण थांबले आहे.


त्यातील अगदी लहान मुले, शाळकरी मुली, मातांना कोरडा पोषण आहार देण्यात येतो. यामध्ये शेवयाचा उपमा, सुकडी याचा समावेश असतो तर ३ ते ६ वयोगटांतील मुला-मुलींना शिजवून आहार दिला जातो. खिचडी, उसळ, लापशीचा समावेश असतो. मात्र, संपामुळे आता या आहाराचे वितरणच बंद आहे.


दोन दिवसांपूर्वी मंत्री पंकजा मुंढे यांनी दीड हजार रूपयांची मानधनवाढ जाहीर केली. त्यानंतर सुमारे २३ ते २७ हजार कर्मचारी कामावर हजर झाले. मात्र बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील आढावा घेतला असून एकही कर्मचारी कामावर हजर झालेला नाही. त्यामुळे संप चिघळण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Anganwadi workers, helpers of the helpers in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.