शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
2
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
3
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
4
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
5
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
6
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
7
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
8
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
9
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
10
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
11
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
12
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
13
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
14
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
15
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
16
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
17
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
18
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
19
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
20
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  

अनिकेतचा खून अनैतिक संबंधातून

By admin | Published: January 11, 2017 12:31 AM

शित्तूर-वारुणच्या खुनाचा उलगडा : पत्नीसह प्रियकर भाच्यास अटक; खबऱ्यामुळे लागला तपास

कोल्हापूर : शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) येथील वारणा नदीच्या पुलाखाली शीर नसलेला मृतदेह अनिकेत गजानन चव्हाण (वय २३, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) याचा असल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले. अनैतिक संबंधात अडथळा ठरल्यामुळे त्याच्या पत्नीने प्रियकर भाच्याच्या मदतीने खून केल्याचे तपासात उघडकीस आले. या प्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी संशयित आरोपी पत्नी प्रिया ऊर्फ स्वाती कृष्णा शिंदे (२७, रा. आपटेनगर), तिचा भाचा जयवंत शामराव पाटील (२५, रा. तळसंदे, ता. हातकणंगले) यांना अटक केली. महिन्यापूर्वी अनिकेतचा मृतदेह मिळाला होता. शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दि. २ डिसेंबर २०१६ रोजी शित्तूर-वारुण येथील वारणा नदीच्या पुलाखाली शीर नसलेला मृतदेह पोलिसांना मिळाला. या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. जिल्ह्यात २५ ते ३० वर्षांचा तरुण बेपत्ता असल्याची वर्दी पोलिस ठाण्यात नव्हती. शाहूवाडी पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, शाहूवाडी विभागीय पोलिस उपअधीक्षक विभाग अशी तीन पथके खुन्याचा शोध घेत होते. शाहूवाडी पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांचे सहकारी नंदकुमार घुगरे, शैलेश पोरे यांना खबऱ्याने अनिकेत चव्हाण हा दि. १ डिसेंबर २०१६ पासून गायब आहे. तो बेपत्ता असल्याची तक्रार कुठेही नसल्याचे सांगितले. तपासाचा धागा मिळाल्याने त्यांनी चौकशी केली, तेव्हा अनिकेतचा प्रिया ऊर्फ स्वाती शिंदे हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. त्यांच्यात वादावादी होत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक गुरव यांनी अनिकेतचे वडील कृष्णात गजानन चव्हाण (५०) यांना बोलावून घेतले. शीर नसलेल्या मृतदेहाचे फोटो व कपडे दाखविताच त्यांनी ते ओळखले. त्यानंतर खुनाचा उलगडा झाला. पोलिसांनी जीवरक्षक सुनील कांबळे, त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने मंगळवारी दिवसभर सरुड येथील वारणा नदीच्या पात्रात शीर टाकलेल्या पिशवीचा शोध घेतला असता ती मिळाली. प्राण्यांनी मांस खाल्ल्याने हाडे व केस मिळाले आहेत.अडथळा केला दूर : पैशासाठी तगाद्याचा राग; काटा काढण्याचा प्लॅनप्रिया शिंदे हिचे पूर्वीपासून भाचा जयवंत पाटील याच्याशी अनैतिक संबंध होते. याची चाहूल अनिकेतला लागल्याने त्यांच्यात नेहमी खटके उडत. अनिकेतने पैशांसाठी तिच्याकडे तगादा लावला होता. आपल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याचा राग तिला होता. तिने याची कल्पना भाचा जयवंतला दिली. त्यानुसार त्यांनी अनिकेतचा काटा काढायचा प्लॅन आखला. प्रियाने फोन करून अनिकेतला १ डिसेंबरला घरी बोलावून घेतले. रात्री झोपल्यानंतर अकराच्या सुमारास जयवंत घरी आला. पहाटे चारच्या सुमारास अनिकेत झोपेत असताना तलवारीचा वर्मी वार डोक्यात केला. त्याला ओरडताही आले नाही. त्यानंतरही अनिकेत तासभर जिवंत होता. त्यानंतर गळा आवळून तलवारीने शीर धडावेगळे केले. दिवसभर मृतदेह घरातच ठेवला. बाहेरून प्लास्टिक कागद खरेदी करून आणला. प्लास्टिक कागदासह ब्लँकेटमध्ये मृतदेह गुंडाळून दोरीने बांधला. त्याचे शीर एका पिशवीत दगड घालून स्वतंत्र बांधून घेतले. सायंकाळी सहा वाजता स्प्लेंडर मोटारसायकलवर गाठोडे बांधले. हँडेलला पिशवी अडकवली. जयवंत हा भाजी विक्रीचा व्यवसाय करत असल्याने तो नेहमी भाजीपाल्याचे गाठोडे बांधून प्रियाच्या घरी येत असे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना शंका आली नाही. तेथून तो मृतदेहाचे गाठोडे घेऊन शिवाजी पूल, बोरपाडळे, बांबवडेमार्गे सरुड येथे आला. तेथे शीर वारणा नदीत टाकले.त्यानंतर पुढे शित्तूर-वारुण नदीपुलाखाली धड टाकून तो परत आपटेनगर येथे आला. खुनातील तलवार विहिरीत टाकल्याने पोलिस शोध घेत आहेत.अशी झाली ओळख अनिकेत चव्हाण हा महादेव चव्हाण (रा. आंबेवाडी) यांच्या ट्रॅव्हर्ल्सवर चालक म्हणून काम करत होता. प्रिया शिंदे हिचे पहिले लग्न कांचनवाडी येथील तरुणाशी झाले. त्यांना एक आठ वर्षांची मुलगी आहे. पतीसोबत वादावादी झाल्याने ती तीन वर्षांपासून आपटेनगर येथे भाड्याने विभक्त राहू लागली. त्यानंतर तिने टोप-संभापूर (ता. हातकणंगले) येथे मसाज सेंटर सुरू केले. याठिकाणी अनिकेत तीन-चारवेळा गेल्याने तिच्याशी ओळख झाली. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळले. अडीच वर्षांपूर्वी दोघांनी न्यायालयीन नोंदणी पद्धतीने प्रेमविवाह केला.