दरम्यान, आज, शनिवारपासून शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजन तपासणीबरोबर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली. कडक लॉकडाऊन असतानाही काही नागरिक दवाखान्याचे कारण सांगत विनाकारण फिरत असल्याने मुख्याधिकारी जाधव यांनी याची शहानिशा करण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांचे पथक नेमले आहे. शहरात सन्मित्र चौक, शिवतीर्थ, पालिका चौकात पथक सक्रिय झाले आहे. विनाकारण रस्त्यावर फिरत असताना मिळून आलेल्या नागरिकांची पालिका चौकातील तपासणी सेंटरमध्ये आणून त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दत्तात्रय मगदूम, अमर घोलप, अनारकली कुरणे, सुनीता नरके यांच्या पथकाने स्वॅब घेऊन नागरिकांची तपासणी केली.
मुख्याधिकारी जाधव, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पालिका करनिरीक्षक साक्षी पाटील यांच्यासह पालिका अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या २५ हून अधिक नागरिकांना पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून सोडून दिले.
फोटो - २१०५२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजन तपासणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील उपस्थित होते.