या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय व अन्य सुविधा उभारण्यात आर्थिक अडचणी येत असून, त्यासाठी परिसरातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांनी आर्थिक हातभार लावल्यास उपनगरांतील रुग्णांची उपचारासाठी होणारी परवड निश्चित थांबणार आहे.
दिवसेंदिवस उपनगरांत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, निव्वळ उपचाराविना रुग्ण दगावण्याच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे क्रीडासंकुलात कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने घेतला होता.
गतवर्षी प्रभागातील मैत्रांगण अपार्टमेंटमध्ये पालिका आरक्षित जागेत संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा करीत जमविलेल्या निधीतून भव्य कोविड सेंटर उभारले होते. आजही याचा लाभ परिसरातील रुग्णांना होत आहे. उपनगरात कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन सुविधा उपलब्ध असणाऱ्या या सेंटरसाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे. तरी मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी गुरुप्रसाद जोशी, किरण पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी केले आहे
फोटो मेल केला आहे. सानेगुरुजी प्रभागातील राजोपाध्येनगरातील भव्य क्रीडासंकुलात ५० बेडचे कोविड सेंटर उभारणीचे काम पूर्णत्वास गेले असून, अत्याधुनिक सुविधा उभारण्यासाठी आर्थिक मदतीचा ओघ सुरू आहे.