मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून काँग्रेसने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात समन्वयक नियुक्त केले आहेत. या समन्वयकांवर लोकसभा निवडणुकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणार आहे. काँग्रेस पक्ष राज्यात इंडिया आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढणार आहे. काँग्रेस नेमक्या किती आणि कोणत्या जागा लढविणार, हे अद्याप निश्चित नसले, तरी काँग्रेसने सर्वच मतदारसंघात आपली संघटनात्मक ताकद उभी करण्याचे ठरविले आहे.काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी रविवारी समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. मुंबई उत्तरसाठी मधू चव्हाण, मुंबई उत्तर पश्चिमसाठी अस्लम शेख, मुंबई उत्तर पूर्वसाठी बलदेव खोसा, मुंबई उत्तर मध्यसाठी अमीन पटेल, मुंबई दक्षिण मध्यसाठी अशोक जाधव, तर मुंबई दक्षिणसाठी वीरेंद्र बक्षी हे समन्वयक असतील.नंदूरबार - कुणाल पाटील, धुळे - नसीम खान, जळगाव - यशोमती ठाकूर, रावेर - प्रणिती शिंदे, दिंडोरी - अमीन पटेल, नाशिक - अमित देशमुख, पालघर - सुरेश टावरे, भिवंडी - अनीस अहमद, रायगड - चारुलता टोकस, पुणे - विश्वजीत कदम, मावळ - हुसेन दलवाई, अहमदनगर - मोहन जोशी, शिर्डी - बाळासाहेब थोरात, कोल्हापूर - पृथ्वीराज चव्हाण आणि सांगलीला सतेज पाटील यांची समन्वयक म्हणून नेमणूक झाली आहे.
लोकसभेसाठी काँग्रेसकडून समन्वयकांची नियुक्ती; पृथ्वीराज चव्हाणांवर कोल्हापूर तर सतेज पाटीलांवर सांगलीची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 11:49 AM