शिवाजी पेठेत सशस्त्र हल्ला,एक जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 11:35 AM2020-12-05T11:35:53+5:302020-12-05T11:37:11+5:30
Crimenews, Police, Kolhapurnews शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कुल परिसरात शुक्रवारी रात्री दहा वाजता झालेल्या सशस्त्र हल्ल्यात सुभाष पोपटराव देवकर (वय ४५, रा. जरगनगर) हा गंभीर जखमी झाला. सुभाष हा बोलू शकत नसल्यामुळे हल्ला कोणी केला याबाबत नेमकी माहिती रात्री उशिरापर्यंत मिळालेली नाही.
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कुल परिसरात शुक्रवारी रात्री दहा वाजता झालेल्या सशस्त्र हल्ल्यात सुभाष पोपटराव देवकर (वय ४५, रा. जरगनगर) हा गंभीर जखमी झाला. सुभाष हा बोलू शकत नसल्यामुळे हल्ला कोणी केला याबाबत नेमकी माहिती रात्री उशिरापर्यंत मिळालेली नाही.
सुभाष देवकर हा देवस्थान समितीकडे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्याने सकाळी सहा ते दुपारी दोन अशी ड्युटी केली. रात्री दहा वाजता निवृत्ती चौकाकडून तो फिरंगाई तालीमकडे जात असताना महाराष्ट्र हायस्कुल जवळ अज्ञाताने त्याला गाठले. त्याच्या तोंडावर दोन तिक्ष्ण हत्याराने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात गंभीर झाल्यामुळे सुभाष तेथेच कोसळला. अज्ञाताने तेथून पलायन केले. रस्त्यावरुन जाणाऱ्या काही जणांनी त्याला रिक्षातून सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
जोराचे वार झाल्याने रक्तस्त्राव मोठ्याप्रमाणात झाला असून सुभाष हा बेशुध्द आहे. त्याच्यावर सीपीआर मध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता खासगी रुग्णालयात दाखल करण्यास आले. हा हल्ला कोणी केला, हल्लेखोर एक होता की दोन होते याबाबत पोलिस तपास करत आहेत.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्यानंतर नेमके काय घडले याचा उलघडा होईल, असे पोलिसांनी सांगितले. देवकर यांच्या मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.