चंद्रेतील शस्त्र तस्करास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:27 AM2021-09-24T04:27:54+5:302021-09-24T04:27:54+5:30
कोल्हापूर : विनापरवाना रिव्हॉल्व्हर बाळगून त्याची तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील एकास सापळा रचून अटक केली. विलास ...
कोल्हापूर : विनापरवाना रिव्हॉल्व्हर बाळगून त्याची तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील एकास सापळा रचून अटक केली. विलास दत्तात्रय मेंगाणे (वय ५०) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून साडेसात हजार रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर जप्त केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बुधवारी कोल्हापूर ते गारगोटी रस्त्यावर चुये फाटा येथे ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चंद्रे येथील विलास मेंगाणे हे बेकायदेशीरपणे रिव्हॉल्व्हर बाळगून त्याची तस्करी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास मिळाली. रिव्हॉल्व्हर विक्री करण्यासाठी ते चुये येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून एक रिव्हॉल्व्हर, काडतूस जप्त केले. त्याला अटक करून मुद्देमालासह इस्पुर्ली पोलीस ठाण्यात हजर केले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले आदींनी केली.
फोटो नं. २३०९२०२१-कोल-विलास मेंगाणे (आरोपी)
फोटो नं. २३०९२०२१-कोल-क्राईम०१
ओळ : जप्त केलेले रिव्हाॅल्व्हर व काडतूस.
230921\23kol_1_23092021_5.jpg~230921\23kol_2_23092021_5.jpg
फोटो नं. २३०९२०२१-कोल-विलास मेंगाणे (आरोपी)फोटो नं. २३०९२०२१-कोल-क्राईम०१ओळ : जप्त केलेले रिव्हाॅल्वर व काडतुस.~फोटो नं. २३०९२०२१-कोल-विलास मेंगाणे (आरोपी)फोटो नं. २३०९२०२१-कोल-क्राईम०१ओळ : जप्त केलेले रिव्हाॅल्वर व काडतुस.