कला महाविद्यालये हाऊसफुल्ल. नियमित वर्ग सुरु ; विद्यार्थ्यांची वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 05:47 PM2018-07-09T17:47:44+5:302018-07-09T17:50:52+5:30

कॉपोरेट क्षेत्रात सर्वाधिक संधी उपलब्ध असल्याने कला शिक्षणाकडे विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्याने कोल्हापूर जिल्हयातील सहा कला महाविद्यालये हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

Art Colleges Housefull Regular classes begin; The students grew up tomorrow | कला महाविद्यालये हाऊसफुल्ल. नियमित वर्ग सुरु ; विद्यार्थ्यांची वाढला कल

कला महाविद्यालये हाऊसफुल्ल. नियमित वर्ग सुरु ; विद्यार्थ्यांची वाढला कल

Next
ठळक मुद्देकला महाविद्यालये हाऊसफुल्ल. नियमित वर्ग सुरु विद्यार्थ्यांची वाढला कल

कोल्हापूर : कॉपोरेट क्षेत्रात सर्वाधिक संधी उपलब्ध असल्याने कला शिक्षणाकडे विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्याने कोल्हापूर जिल्हयातील सहा कला महाविद्यालये हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

दहवीचा निकालानंतर कलाशिक्षण महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया होवून प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही महाविद्यालयांची ९५ टक्के पर्यंत मेरिटिल्ट पोहचली होती. कला क्षेत्रामध्ये शिक्षण घेताना फोटोग्राफी, डॉक्युमेंटरी,व्हिडिओ एडिटिंग, वॉल पेटिंग, ग्राफिक डिझायनिंग अशी विविध कामे विद्यार्थ्यांन करतात येतात.

शहरातील दळवीज् आर्टस् इन्स्टिटयूट, रा. शि. गोसावी कलानिकेतन, कलामंदिर महाविद्यालयांचा तर जिल्हयातील साधना कला महाविद्यालय गडहिंग्लज, ललित कला महाविद्यालय इचलकरंजी, जे. एन. भंडारी स्कूल आॅफ आर्ट चंदगडचा समावेश आहे.

यामध्ये दळवीज् आर्टस् इन्स्टिटयूमध्ये एकूण ४०, कलानिकेतन महाविद्याल व कलामंदिर महाविद्यालयात प्रत्येकी तीस अशा एकूणशंभार जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया झाली. तीन महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून काही महाविद्यालयाचे नियमत वर्ग सुरु झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंंदा कला महाविद्यालयात प्रवेश घेण्यार्यांची संख्या वाढल्याचे यंदा दिसून आले.

सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांच्यामध्ये कलेविषयी अभिरुची वाढत आहे. तसेच प्रत्येक क्षेत्राशी कलाक्षेत्र निगडीत असल्याने यामध्ये करिअर मोठी संधी व नवे क्षेत्र दिवसेन दिवस वाढत असल्याने कला महाविद्यालयांत प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.
- अजेय दळवी

 

Web Title: Art Colleges Housefull Regular classes begin; The students grew up tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.