लसीच्या उपलब्धतेनुसार केंद्र सुरू ठेवली जात असल्यामुळे कधी २५० तर कधी ५० केंद्रच सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळते. प्रत्यक्षात सकाळी १० नंतर जरी लसीकरण सुरू होणार असले तरी सकाळी सात पासूनच नागरिक रांगा लावत असून बहुतांशी केंद्रांवर हे चित्र दिसून येत आहे. ऑनलाईन नाव नोंदवले, नाही नोंदवले, दुसऱ्या डोससाठी ऑनलाईन नाव नोंदवायचे की नाही, दुसऱ्या डोसची मुदत संपली आहे तरी लस मिळाली नाही असे अनेक प्रश्न घेऊन नागरिक केंद्रांवर रांगा लावत आहेत आणि त्यातून मिळेल त्याला मिळेल असेच चित्र सध्या दिसून येत आहे.
कोट
लस मिळणार म्हणून आयसोलेशन रूग्णालयात सकाळी साडेनऊ वाजता गेले. परंतु लस नाही म्हणून सांगण्यात आले. पुन्हा दुपारी साडेतीन वाजता गेले. तरीही लस आली नाही म्हणून सांगितले. माझ्या पतींचे वय ८० आहे, माझे ७० आहे. या वयात अशा फेऱ्या मारून लस मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मृण्मयी जगदाळे, हनुमाननगर