स्मॅक अध्यक्षपदी अतुल पाटील,उपाध्यक्षपदी दीपक पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:24 AM2021-03-08T04:24:12+5:302021-03-08T04:24:12+5:30
स्मॅक भवन येथे रविवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सन २०२१-२२ करिता ह्या निवडी करण्यात आल्या. त्याचबरोबर खजानिसपदी ...
स्मॅक भवन येथे रविवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सन २०२१-२२ करिता ह्या निवडी करण्यात आल्या.
त्याचबरोबर खजानिसपदी एम. वाय. पाटील, सेक्रेटरीपदी जयदीप चौगले यांची वर्णी लागली.
पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांची शिखरसंस्था म्हणून ‘स्मॅक’ची ओळख आहे. ‘स्मॅक’ला ४९ वर्षे पूर्ण झाली असून गेल्या ४९ वर्षांत ‘स्मॅक’च्या माध्यमातून शिरोली एमआयडीसीमधील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम ‘स्मॅक’ने केले आहे. शासनदरबारी अनेक प्रश्न मांडण्याचे काम ‘स्मॅक’च्या माध्यमातून केले जाते. या निवडीनंतर अध्यक्ष अतुल पाटील यांनी एमआयडीसीमधील उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न सोडविणार, यामध्ये कामगारांसाठी सेवा दवाखाना, नियोजित आयटीआय इमारत, सॅण्ड रिक्लेमेशन प्लॅन्ट विस्तारीकरण, शिरोली औद्योगिक वसाहत सीसीटीव्ही निरीक्षणाखाली आणण्याचा मानस आहे. या बैठकीला ‘स्मॅक’चे ज्येष्ठ संचालक सुरेंद्र जैन, श्यामसुंदर तोतला, जयदत्त जोशीलकर, भरत जाधव, सचिन पाटील, नीरज झंवर, अमर जाधव, प्रशांत शेळके, सोहन शिरगांवकर उपस्थित होते.
फोटो ओळी
अतुल पाटील - स्मॅक अध्यक्ष
दीपक पाटील - स्मॅक उपाध्यक्ष
राजू पाटील -स्मॅक आयटीआय अध्यक्ष
निरज झंवर - स्मॅक सॅण्ड प्लॅन्ट अध्यक्ष,
एम. वाय. पाटील - खजानिस
जयदीप चौगले - सेक्रेटरी