बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्र, पत्रव्यवहार प्रदर्शनाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 03:56 PM2019-02-09T15:56:18+5:302019-02-09T15:59:52+5:30
श्री छत्रपती शाहू महाराज स्वंयरोजगार संस्था, कोल्हापूरतर्फे संस्थापक रणजित सांगावकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनात भरविण्यात आले आहे. याचे उदघाटन मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मिळ छायाचित्रे देशभरातील विविध ठिकाणांहून संग्रहित करुन बाबासाहेबांचा इतिहास छायाचित्रांच्या माध्यमातून जनतेला समजावा यासाठी महाराष्ट्राच्या अनेक जिल्हयात दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन स्वखर्चाने भरविणारे स्मृतीशेष रणजित सागांवकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कार मिळावा यासाठी शासन दरबारी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी व्यक्त केले.
श्री छत्रपती शाहू महाराज स्वंयरोजगार संस्था, कोल्हापूरतर्फे संस्थापक रणजित सांगावकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनात भरविण्यात आले आहे. याचे उदघाटन मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, उपजिल्हाकारी बाबासो वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेल्वे अनिल सरवदे, मंथन फौंडेशनचे अध्यक्ष मारुती माने, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, रिपाइंचे (गवई) भाऊसो काळे, नंदकुमार गोंधळी, इंद्रजित आडगुळे, निलेश हंकारे, धनंजय सावंत, सुभाष देसाई आदी उपस्थित होते. अध्यक्ष संदीप सांगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्वप्निल पन्हाळकर यांनी सुत्रसंचालन केले. उपाध्यक्ष दिलीप सांगावकर यांनी आभार मानले.