आदिती, आयुष, साजिरी यांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:26 AM2021-03-16T04:26:33+5:302021-03-16T04:26:33+5:30

शाहू स्मारक भवनात झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूरसह कऱ्हाड, आदी भागांतून ५५ मुला-मुलींनी सहभाग नोंदवला होता. पुण्यातील दोन विद्यार्थ्यांनी व्याख्यान ...

Baji of Aditi, AYUSH, Sajiri | आदिती, आयुष, साजिरी यांची बाजी

आदिती, आयुष, साजिरी यांची बाजी

Next

शाहू स्मारक भवनात झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूरसह कऱ्हाड, आदी भागांतून ५५ मुला-मुलींनी सहभाग नोंदवला होता. पुण्यातील दोन विद्यार्थ्यांनी व्याख्यान दिले.

स्पर्धेचा निकाल असा, कोल्हापूर महानगर पालिका गट : आदिती बळवंत जाधव, प्रसन्न जनार्दन ओंकार, श्रावणी प्रसाद हैबत्ती, श्रद्धा तानाजी जाधव, जिल्हा परिषद गट - आयुष कृष्णात पाटील, प्रतीक्षा सुरेश येरूडकर, जोया अब्दुलरहिम मुल्ला, शुभम आनंदा राणे. कऱ्हाड ग्रुप - साजिरी जगदीश कुंभार, हर्षवर्धन विजय पाटील, अथ‌र्व अशोक पिसाळ, मधुजा तानाजी सुर्वे यांचा समावेश आहे. स्पर्धेचा बक्षीस समारंभ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, शिक्षणाधिकारी किरण लोहार, आदी मान्यवरांच्या उपस्थित झाला. स्वागत व प्रास्ताविक अशोक पोवार यांनी केले. रमेश मोरे यांनी आभार मानले.

यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विजयसिंह पाटील, किसन कल्याणकर, विजय सुतार, राजू कोरे, प्रभाकर लोखंडे, युवराज कदम, आदी उपस्थित होते.

फोटो : १५०३२०२१-कोल-प्रतिष्ठान

ओळी : कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस समारंभप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. डी. टी. शिर्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Baji of Aditi, AYUSH, Sajiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.