दक्ष रहा, अडचणीला वरिष्ठांची मदत घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:25 AM2021-09-19T04:25:39+5:302021-09-19T04:25:39+5:30
कोल्हापूर : प्रत्येकांनी दक्ष राहून कर्तव्य बजावावे, गर्दी होणार नाही याची काळजी घ्या, अडचणीला वरिष्ठांची मदत घ्या, असे आवाहन ...
कोल्हापूर : प्रत्येकांनी दक्ष राहून कर्तव्य बजावावे, गर्दी होणार नाही याची काळजी घ्या, अडचणीला वरिष्ठांची मदत घ्या, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना केले.
सार्वजनिक गणेश विसर्जन आज, रविवारी होणार आहे. जिल्ह्यात अडीच हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. शनिवारी सायंकाळी भवानी मंडपात पोलीस बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना बंदोबस्ताचे पॉईंट नेमण्यात आले. याप्रसंगी अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
प्रत्येक गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेश मिरवणूक पोलीस दलाच्या दृष्टीने आव्हानात्मक काम असते. पण यंदाही संभाव्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीवर बंदी घातली आहे. त्याबाबतच्या सूचना सर्व मंडळांना देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक गणेशमूर्ती सोबत मंडळाचे मोजकेच कार्यकर्ते असतील. प्रत्येकाने नागरिकांशी सौजन्याने वागावे, वादाचे प्रसंग टाळा, मिरवणूक मार्गासह विसर्जन परिसरात खाद्य पदार्थाच्या हातगाड्या लागणार नाही याचीही दक्षता घ्या असे आवाहन केले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, शाहूपुरीचे राजेंद्र गवळी, राजारामपुरी ईश्वर ओमासे, जुना राजवाडाचे दत्तात्रय नाळे आदी उपस्थित होते.
टॉवर ते खण मार्गावर नो पार्किंग
रंकाळा टॉवर ते इराणी खण या विसर्जन मार्गावर नो पार्किंग असून या मार्गावर वाहन पार्किंग होणार नाही याची खबरदारी घ्या. आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची मदत घ्या अशा सूचना अधीक्षक बलकवडे यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या.
शहरात पोलीस बंदोबस्त...
- पोलीस अधीक्षक : ०१
- अपर पोलीस अधीक्षक : ०२
- पोलीस उपअधीक्षक :०३
- पोलीस निरीक्षक : १२
- सहा. पो. नि./उपनिरीक्षक : ४५
- पोलीस कर्मचारी : ६२६
- होमगार्ड : ५२९
- स्ट्रायकिंग/ प्लाटून : १४ तुकड्या
फोटो नं. १८०९२०२१-कोल-पोलीस०१,०२
ओळ : सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी कोल्हापूर शहरातील पोलीस बंदोबस्ताचे भवानी मंडपात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
180921\18kol_1_18092021_5.jpg~180921\18kol_2_18092021_5.jpg
सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी कोल्हापूर शहरातील पोलीस बंदोबस्ताचे भवानी मंडपात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)~सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी कोल्हापूर शहरातील पोलीस बंदोबस्ताचे भवानी मंडपात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)