कोल्हापुरातील शेवटचे चित्तेवान काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:29 AM2021-09-07T04:29:01+5:302021-09-07T04:29:01+5:30

दस्तगीर हे संस्थानकाळात चित्ता पाळणारे कोल्हापूरचे शेवटचे ‘चित्तेवान’ होते. शिकार करण्यासाठी चित्याला प्रशिक्षित करण्यात त्यांचे वडील इस्माईल रहिमान चित्तेवान ...

Behind the curtain of the last Chittevan period in Kolhapur | कोल्हापुरातील शेवटचे चित्तेवान काळाच्या पडद्याआड

कोल्हापुरातील शेवटचे चित्तेवान काळाच्या पडद्याआड

Next

दस्तगीर हे संस्थानकाळात चित्ता पाळणारे कोल्हापूरचे शेवटचे ‘चित्तेवान’ होते. शिकार करण्यासाठी चित्याला प्रशिक्षित करण्यात त्यांचे वडील इस्माईल रहिमान चित्तेवान यांचा हातखंडा होता. यासाठी त्यांना राजाराम महाराजांनी ‘जमादार’ ही बिरुदावली दिली होती. याबद्दल त्यांना बक्षीस म्हणून बागल चौकात घरही दिले. दस्तगीर जमादार हे चित्यामार्फत शिकारी करणारे शेवटचे चित्तेवान होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना घरीच झालेल्या छोट्या अपघातामुळे त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांनी जेवणखाण सोडले होते. सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. जियारत विधी बुधवारी होणार आहे.

अल्बमच्या रूपात आठवणी होणार जिवंत

अलीकडेच त्यांच्याकडच्या चित्ता शिकारीच्या काही दुर्मीळ निगेटिव्हज आढळल्या आहेत. दस्तगीर यांचे पुतणे स्वालेमहंमद निजाम चित्तेवान यांनी वन ट्वेन्टी फॉर्मेटमधील १९५२ च्या दशकातील या १६ मूळ निगेटिव्हजचा दुर्मीळ खजाना इतिहास संशोधक नेर्लेकर-देसाई यांच्याकडे सुपूर्द केला. छायाचित्रकार मकरंद मांडरे आणि सर्वेश देवरुखकर यांनी या निगेटिव्हजवर प्रक्रिया करून ही दुर्मीळ छायाचित्रे उपलब्ध केली आहेत. याचा समावेश ‘रॉयल हंटींग चित्ताज ऑफ कोल्हापूर स्टेट’ या नावाच्या इंग्रजी अल्बममध्ये करण्यात येणार आहे.

--------------------------

06092021-kol-Dastgir chitewan

फोटो ओळी : दस्तगीर जमादार चित्तेवान (छाया : आदित्य वेल्हाळ).

फोटो : 06092021-kol-Dastgir chitewan1

फोटो ओळी : दस्तगीर जमादार चित्तेवान

06092021-kol-Dastgir chitewan2

फोटो ओळी : दस्तगीर जमादार चित्तेवान

Web Title: Behind the curtain of the last Chittevan period in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.