भाई विलासराव पाटील यांचा स्मृतिदिन प्रेरणादायी : राजेंद्र पाटील-यड्रावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:28 AM2021-09-15T04:28:33+5:302021-09-15T04:28:33+5:30
शिरोळ : डाव्या व समाजवादी विचाराचा वारसा लाभलेले भाई विलासराव पाटील यांनी मा. आ. अप्पासाहेब ऊर्फ सा.रे. पाटील यांच्या ...
शिरोळ : डाव्या व समाजवादी विचाराचा वारसा लाभलेले भाई विलासराव पाटील यांनी मा. आ. अप्पासाहेब ऊर्फ सा.रे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चळवळ उभी करण्याचे काम केले होते. त्यांच्यानंतर त्यांच्या वारसांनीसुद्धा परंपरागत कालबाह्य गोष्टी टाळून पुरोगामी पद्धतीने आरोग्य महोत्सवाचे आयोजन करून समाजाला नवी दिशा दिली आहे, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
सैनिक टाकळी (ता.शिरोळ) येथील स्वातंत्र्यसेनानी भाई विलासराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य महोत्सवात मंत्री यड्रावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील होते. यावेळी डॉ. विजयकुमार माने, संदीप कांदे-पाटील, प्रा. संजीव पोफरे, डॉ. विकास पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जीवक लाइफ आणि न्यूट्रिफिल हेल्थ प्रॉडक्टच्या वतीने आयुर्वेदिक औषध प्रदर्शन व प्रबोधन पुस्तक एक्स्प्रेसच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन पार पडले.
सूत्रसंचालन घोटणे, तर प्रास्ताविक प्रा. विनोदसिंह पाटील यांनी केले. स्वागत अशोक पाटील, मधुकर पाटील व विश्वलता पाटील यांनी केले. कार्यक्रमास पं. स. सभापती दीपाली परीट, डी. आर. पाटील, रणजितसिंह पाटील, सुदर्शन भोसले, डॉ. विकास पाटील, बबन चावरे, बाबासाहेब बाबर, सुशांत कोष्टी, विनोद पाटील, मनोहर भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मिलिंद पाटील यांनी आभार मानले.
फोटो - १४०९२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे भाई विलासराव पाटील यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.