कोल्हापूरहून रेल्वेतर्फे ‘भारत दर्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:38 AM2017-11-15T00:38:48+5:302017-11-15T00:40:01+5:30

कोल्हापूर : इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारा कोल्हापूरहून ‘भारत दर्शनयात्रे’चे आयोजन केले आहे. कॉर्पोरेशनच्या पर्यटन विभागाचे सहायक प्रबंधक गुरुराज सोन्ना यांनी ही माहिती दिली.

'Bharat Darshan' by Kolhapur Railway | कोल्हापूरहून रेल्वेतर्फे ‘भारत दर्शन’

कोल्हापूरहून रेल्वेतर्फे ‘भारत दर्शन’

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर रेल्वे स्टेशनवर पर्यटक, प्रवाशांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारावे

कोल्हापूर : इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारा कोल्हापूरहून ‘भारत दर्शनयात्रे’चे आयोजन केले आहे. कॉर्पोरेशनच्या पर्यटन विभागाचे सहायक प्रबंधक गुरुराज सोन्ना यांनी ही माहिती दिली. दरम्यान, पर्यटक, प्रवाशांच्या मागणीनुसार कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर माहिती केंद्र लवकरच स्थापन करण्यात येणार आहे.
११ रात्री आणि १२ दिवसांची ही सहल उदयपूर, अजमेर, जयपूर, मथुरा, हरिद्वार, अमृतसर, कटरा येथे नेण्यात येणार आहे. कोल्हापूरहून निघून पुन्हा कोल्हापूर अशा पद्धतीचा यामध्ये प्रवास होणार असून दोनवेळचा नाश्ता व जेवणाचीही सोय करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अधिक माहितीसाठी रेल्वे स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर पर्यटक, प्रवाशांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारावे, अशी मागणी गेली
काही वर्षे करण्यात येत आहे,कारण स्टेशनवर उतरल्यानंतर कोल्हापूरबाबत कोणतीच माहिती मिळत नाही. कोल्हापूरहून अशाच प्रकारे आणखी रेल्वे सहली नेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मोहन शेटे, रवी सरदार, शिवनाथ बियाणी, वासीम सरकवास उपस्थित होते.

 

Web Title: 'Bharat Darshan' by Kolhapur Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.