मलकापूर उपनगराध्यक्षपदी भारत गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:28 AM2021-09-14T04:28:03+5:302021-09-14T04:28:03+5:30
मलकापूर नगर परिषदेत भाजप - जनसुराज्य व डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया युतीची सत्ता आहे. आघाडीत ठरलेल्या तडजोडीनुसार ...
मलकापूर नगर परिषदेत भाजप - जनसुराज्य व डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया युतीची सत्ता आहे. आघाडीत ठरलेल्या तडजोडीनुसार पहिली अडीच वर्षे जनसुराज्यकडे उपनगराध्यक्ष पद होते. या कालावधीत दिलीप पाटील व सोनिया शेंडे यांनी उपनगराध्यक्ष पद भूषविले होते. त्यानंतर भाजपचे प्रवीण प्रभावळकर यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदाचा कार्यभार देण्यात आला होता. प्रवीण प्रभावळकर यांनी राजीनामा दिल्याने या पदावर भाजपचे नगरसेवक भारत गांधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर, दिलीप पाटील, अशोक देशमाने, रमेश चांदणे, सोनिया शेंडे, विरोधी आघाडीच्या गटनेत्या माया पाटील, नगरसेवक सुहास पाटील, प्रल्हाद पळसे, सुभाष कोळेकर, नगरसेविका संगीता पाटील, शालन सोनावळे, आदींसह भाजप, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समर्थक व मलकापूर नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.