समीर देशपांडे ।कोल्हापूर : सध्या महाराष्ट्रामध्ये सत्ता नसल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचाच आधार घ्यावा लागत आहे. नरेंद्र मोदी यांनी धडाकेबाज निर्णय घेतला की, बिंदू चौकामध्ये साखर वाटप करणे आणि महाराष्ट्र सरकारने एखादा निर्णय घेतला तर तो चुकीचा आहे यासाठी आंदोलन करणे, असे दुहेरी काम आता भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना करावे लागत आहे. नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्या वर्षपूर्तीवेळी जिल्ह्यात हे चित्र दिसत आहे.
गेल्या सहा वर्षांमध्ये भाजपात कोल्हापूरचे सुपुत्र चंद्रकांत पाटील यांना विशेष महत्त्व आल्याचे पाहावयास मिळते. मराठा आरक्षणापासून ते टोलमुक्तीपर्यंतच्या अनेक बाबतीत पाटील यांनी निर्णायक भूमिका बजावली. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेबाहेर बसावे लागले. आता पाटील यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यातील भाजप कार्यरत आहे; परंतु राज्यात सत्ता नसल्याने आमचे मोदी सरकार किती चांगले काम करीत आहे, हे सांगण्याची एकही संधी जिल्हापातळीवर मंडळी सोडत नाहीत. मोदी यांचे सरकार दुसºया टर्ममधील पहिले वर्ष पूर्ण करीत असताना जिल्ह्यात भाजपला केंद्राच्याच कामगिरीचा आधार घ्यावा लागत आहे.
फडणवीस, पाटील यांच्या तोफासध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आक्रमक पवित्र्यामध्ये आहेत. त्यातही पाटील अशी काही विधाने करतात की, त्यामुळे राज्यात खळबळ उडते. त्यावर टीकाटिप्पणीही होते. मात्र आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील ऊर्जा टिकविण्यासाठी ते अशी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.महापालिका, ‘गोकुळ’च्या मैदानात कस..सध्या माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासारखे नेते भाजपचा किल्ला लढवीत आहेत. मात्र, राज्यात सत्ता नसताना एकाच वेळी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेशी लढत असताना मर्यादाही पडत आहेत. कोरोना संपल्यानंतर जेव्हा सर्व काही सुरळीत होईल आणि कोल्हापूर महापालिकेपासून ते ‘गोकुळ’पर्यंत संस्थांच्या निवडणुका लागतील, तेव्हा या सर्वांचा कस लागणार आहे.
च्सध्या माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासारखे नेते भाजपचा किल्ला जिल्ह्यात लढवीत आहेत.च्मात्र राज्यात सत्ता नसताना एकाच वेळी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेशी लढत असताना अनेक मर्यादाही पडत आहेत. कोरोना संपल्यानंतर जेव्हा सर्व काही सुरळीत सुरू होईल आणि कोल्हापूर महापालिकेपासून ते ‘गोकुळ’पर्यंत संस्थांच्या निवडणुका लागतील, तेव्हा या सर्वांचा कस लागणार आहे.