चंदृकांत पाटील यांना धक्का, तालुक्यातीलच पंचायत समिती सदस्या शिवसेनेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 12:31 PM2021-06-07T12:31:01+5:302021-06-07T12:47:08+5:30
Politics Bjp ShivSena Kolhapur : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच तालुक्यात राजकीय धक्का बसला आहे. पाटील यांच्या भुदरगड तालुक्यामधील भाजपच्या एकमेव आकुर्डे मतदारसंघाच्या पंचायत समिती सदस्या असलेल्या आक्काताई प्रवीण नलावडे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच तालुक्यात राजकीय धक्का बसला आहे. पाटील यांच्या भुदरगड तालुक्यामधील भाजपच्या एकमेव आकुर्डे मतदारसंघाच्या पंचायत समिती सदस्या असलेल्या आक्काताई प्रवीण नलावडे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिवसेना सहसंपर्क प्रमुख खासदार संजय मंडलिक व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून घेतले.
आमदार प्रकाश आबिटकर आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही एकाच भुदरगड तालुक्यातील आहेत. पाटील यांचे मूळ गाव याच तालुक्यात खानापूर असून पाटील यांनी मंत्री झाल्यावर या परिसरात सातत्याने संपर्क ठेवला होता. नलावडे यांना शिवसेनेत घेवून आता थेट पंचायत समितीचे सभापतीपद दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
या पक्षप्रवेशावेळी गोकुळचे नूतन संचालक नंदकुमार डेंगे, राहुरी कृषी विद्यापीठ संचालक दत्ताजी उगले, बाजार समिती संचालक कल्याणराव निकम यांच्यासह मान्यवर उपस्थितह होते.