रणजित पाटील म्हणाले, कोरोनामुळे झालेली अर्थव्यवस्थेची तूट भरून काढण्यासाठी इतर देश थेट देशाच्या तिजोरीतून लोकांना मदत करत आहे. मात्र, आपलं केंद्र सरकार अतिरिक्त कर लावून लोकांकडूनच वसुली करत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू आणि पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य जनतेला जगणे अवघड झाले आहे. अच्छे दिनाची दिवास्वप्न दाखवणाऱ्या सरकारने लोकांचे जगणे मुश्कील करून ठेवले आहे.
यावेळी भुदरगड तालुका राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, गारगोटीच्या उपसरपंच स्नेहल कोटकर, आनंदा देसाई, आदींची केंद्र सरकारच्या विरोधात भाषणे झाली.
यावेळी पंचायत समिती सदस्य संग्राम देसाई, संतोष मेंगाने, महिला तालुकाध्यक्ष विद्या कदम, शहराध्यक्ष शरद मोरे, माजी उपसरपंच शेखर देसाई, अजित देसाई, सचिन देसाई, जयवंत गोरे, गौरव देसाई, विजय आबिटकर, नामदेव कांबळे, भालचंद्र कलकुटकी, आदी आंदोलनात सहभागी होते.
फोटो ओळ :
गारगोटी : भुदरगड तहसीलदार यांना निवेदन देताना रणजितसिंह पाटील, विश्वनाथ कुंभार, स्नेहल कोटकर, शरद मोरे, विजय आबिटकर, शेखर देसाई, संतोष मेंगाने, आदी.