चौदा हजार पालकांनी केली पुस्तके परत; आपण कधी करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:25 AM2021-05-11T04:25:17+5:302021-05-11T04:25:17+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाने समग्र (सर्व) शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सन २०१९-२० आणि सन २०२०-२१ मध्ये ...
कोल्हापूर : राज्य शासनाने समग्र (सर्व) शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सन २०१९-२० आणि सन २०२०-२१ मध्ये मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली. ही जुनी सुस्थितीतील पाठ्यपुस्तके शाळांमध्ये पुनर्वापरासाठी जमा करावीत, असे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना केले आहे. त्याला प्रतिसाद देत आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १४,६९७ पालकांनी त्यांच्या पाल्यांकडून पुस्तकांचे संच शाळांमध्ये जमा केले आहेत.
जुनी पुस्तके जमा करून घेण्यामागे विद्यार्थ्यांना पुस्तके सुस्थितीत ठेवण्याची सवय लागावी असा उद्देश आहे. ही पुस्तके जमा करण्यासाठी व्हॉटस्ॲप, फेसबुक, ई-मेल आदी सोशल मीडियाचा वापर करावा. पालक, विद्यार्थ्यांना आवाहन करावे. त्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगावे. जे पालक, विद्यार्थी स्वेच्छेने पुस्तके जमा करण्यास इच्छुक असतील त्यांच्याकडून ती जमा करण्यात यावीत, असे आवाहन शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना केले आहे.
मुख्याध्यापकांच्या सूचनेनुसार शिक्षकांनी पालकांना आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्ह्यातील पालकांनी १४,६९७ पुस्तकांचे संच शाळांमध्ये जमा केले आहेत. त्यात मराठी माध्यमाची १४,२८६, इंग्रजी ४८, कन्नड २४ तर उर्दू माध्यमाची ३३९ पुस्तके आहेत.
पॉईंटर
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी
पहिली : ५५३०१
दुसरी : ५७४५२
तिसरी : ५७६०९
चौथी : ५७८३४
पाचवी : ५७७५१
सहावी : ५७३९५
सातवी : ५८३२०
आठवी : ५८८००
चौकट
मागील वर्षी किती संच वाटप
समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण ३,२६,९३० विद्यार्थ्यांना एकूण १६,८५,९८८ हजार पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
===Photopath===
100521\10kol_1_10052021_5.jpg
===Caption===
डमी (१००५२०२१-कोल-टेस्ट बुक रिटर्न डमी)