पाणीपुरवठ्याच्या वाहिनीतून निघाल्या बाटल्या, चपले, गोणपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:52 PM2021-05-07T16:52:01+5:302021-05-07T16:55:47+5:30

Water MuncipaltyCarporation Kolhapur : फुलेवाडी रिंग रोडवरील तब्बल १४ कॉलन्यांचा पाणीपुरवठा गेल्या चार- पाच दिवसांपासून बंद होता. नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. रस्त्यावर दोन ठिकाणी केलेल्या खुदाईनंतर पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीत प्लास्टिकच्या बाटल्या, चपला, गोणपाट आदी अडकून पडल्याचे आढळले. या जलवाहिनीत अशा प्रकारचा कचरा अडकून वारंवार पाणीपुरवठा खंडित होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, हा कचरा जलवाहिनीत कोठून येतो, याचा पाणीपुरवठा विभागाने शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Bottles, slippers, gonapats coming out of the water supply | पाणीपुरवठ्याच्या वाहिनीतून निघाल्या बाटल्या, चपले, गोणपाट

पाणीपुरवठ्याच्या वाहिनीतून निघाल्या बाटल्या, चपले, गोणपाट

googlenewsNext
ठळक मुद्देपाणीपुरवठ्याच्या वाहिनीतून निघाल्या बाटल्या, चपले, गोणपाट फुलेवाडी रिंग रोडवरील प्रकार : १४ कॉलन्यांत पाणीटंचाई; दोन ठिकाणी खुदाई

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोडवरील तब्बल १४ कॉलन्यांचा पाणीपुरवठा गेल्या चार- पाच दिवसांपासून बंद होता. नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. रस्त्यावर दोन ठिकाणी केलेल्या खुदाईनंतर पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीत प्लास्टिकच्या बाटल्या, चपला, गोणपाट आदी अडकून पडल्याचे आढळले. या जलवाहिनीत अशा प्रकारचा कचरा अडकून वारंवार पाणीपुरवठा खंडित होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, हा कचरा जलवाहिनीत कोठून येतो, याचा पाणीपुरवठा विभागाने शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

फुलेवाडी रिंग रोडवरील बहुतांशी कॉलन्यांमध्ये गेल्या आठवडाभर पाणीपुरवठा खंडित झाला होता. भागातील सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई, नागदेववाडीचे ग्रामपंचायत सदस्य समीर पोवार, माजी सरपंच मंगेश गुरव, माजी सदस्य दीपक माळवदे, विजय तायशेटे यांनी महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा करून पाणीपुरवठा सुरळीत केला. रिंग रोडवर अयोध्या कॉलनी व बोंद्रेनगर येथे खुदाई केल्यानंतर जलवाहिनीत चपला, बाटल्या, गोणपाट आदी कचरा मिळून आला.

जलवाहिनीतील हा कचरा काढण्याचे काम सुरू आहे. दोन वर्षांपूर्वीही अशाच पद्धतीने याच जलवाहिनीतून कचरा बाहेर काढला होता. वारंवार उद्‌भवणाऱ्या समस्यांना नागरिक त्रासले आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत हा कचरा कोठून येतो? याचा महापालिकेने शोध लावावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

कॉलनीतील पाणीपुरवठा खंडित

गजानन कॉलनी, अयोध्या कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी, ग्रामसेवक पार्क, महालक्ष्मी पार्क, तसेच सद्‌गुरू कॉलनी, ज्योतिर्लिंग कॉलनी, सोनाई पार्क, शिवशक्ती कॉलनी, भोगम पार्क, गणेश पार्क, महेश्वर कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी या कॉलन्यांतील पाणीपुरवठा खंडित झाला.

बिल्डर, पदाधिकाऱ्यांचे लाड

परिसरात सर्व कॉलन्यांत रिंग रोडवरील ४ इंची जलवाहिनीतून पाणी कनेक्शन दिली आहेत; पण काही बांधकाम व्यावसायिकांनी रिंग रोडवरून गेलेल्या १६ इंची या मुख्य जलवाहिनीवरून पाणी कनेक्शन घेतली आहेत. काहींनी आपल्या फार्म हाऊससाठीही याच मुख्य जलवाहिनीवरून पाणी कनेक्शन घेतली आहेत; पण महापालिकेच्या डोळेझाक कारभारामुळे याची वाच्यता करण्यास कोणीही तयार नसल्याची परिसरात चर्चा आहे.
 

Web Title: Bottles, slippers, gonapats coming out of the water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.