चिनी वस्तूंचा बहिष्कार आज तरी स्टेटसपुरताच, राजरोस विक्री सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 04:56 PM2020-06-19T16:56:10+5:302020-06-19T16:57:21+5:30

चिनी वस्तूंवरील बहिष्कार हा सध्या तरी मोबाईलवरील ह्यस्टेटसह्णपुरताच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक दुकानांमध्ये या वस्तूंची विक्री अजून सुरूच आहे. लोकांकडूनही त्यांना मागणी आहे आणि अनेकांना ती वस्तू चिनी आहे, हेच माहीत नाही.

Boycott of Chinese goods continues till date, Rajaros sales continue: Shopkeepers' role in not ordering goods | चिनी वस्तूंचा बहिष्कार आज तरी स्टेटसपुरताच, राजरोस विक्री सुरूच

चिनी वस्तूंचा बहिष्कार आज तरी स्टेटसपुरताच, राजरोस विक्री सुरूच

Next
ठळक मुद्दे चिनी वस्तूंचा बहिष्कार आज तरी स्टेटसपुरताच, राजरोस विक्री सुरूच माल संपल्यावर न मागवण्याची दूकानदारांची भूमिका

कोल्हापूर : चिनी वस्तूंवरील बहिष्कार हा सध्या तरी मोबाईलवरील ह्यस्टेटसह्णपुरताच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक दुकानांमध्ये या वस्तूंची विक्री अजून सुरूच आहे. लोकांकडूनही त्यांना मागणी आहे आणि अनेकांना ती वस्तू चिनी आहे, हेच माहीत नाही.

जीवघेण्या कोरोना विषाणूची उत्पत्ती करणाऱ्या व भारताविरुद्ध युद्धपरिस्थिती निर्माण करणाऱ्या चीनमध्ये उत्पादित झालेल्या सर्व वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन करण्यात आले. त्यास पूरक म्हणून अनेक संस्था-संघटना, राजकीय पक्षांनी या वस्तूंची जाहीर होळी केली. चीनला धडा शिकवण्याची लंबीचवडी भाषणे ठोकली; परंतु ही निषेधाची भावना अजून सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेली नाही.

चीन उत्पादित सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी देशभरात जनजागृती होऊ लागली आहे. देशातील व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन ट्रेडर्स फेडरेशन (कॅट), महाराष्ट्र कंझ्युमर प्रॉडक्टस डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजसारख्या विविध संस्था, पक्ष, संघटनांनी चिनी वस्तू वापरायच्या नाहीत. त्यांच्या निषेधार्थ त्या वस्तूंचे दहन करण्यास सुरुवात केली आहे.

प्रत्यक्षात टिकली ते ब्लेड, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक, स्टेशनरी, कापड, तयार कपडे, विविध नक्षीकाम केलेल्या काचेच्या वस्तू अशा एक ना शेकडो वस्तू शहरातील बहुतांश दुकाने व रस्त्यांवर विकल्या जात आहेत. दुकानदारांकडे या वस्तूंचा साठा मोठ्या प्रमाणात आहे.

गुंतवणूक केलेला पैसा तरी निघावा, या उद्देशाने व्यापारी सध्या या मालाची विक्री करीत आहेत. अनेकांनी साठा संपल्यानंतर पुन्हा माल मागवायचा नाही, असे ठरविले आहे. त्यामुळे सध्या तरी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध दुकानांमध्ये चिनी मालविक्री सुरूच आहे.

मोबाईल स्टेटसवर निषेध

भारतीय सामान - हमारा अभियान देशातील उत्पादित मालाच्या सन्मानार्थ, तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची वेडीवाकडी चित्रे, चीन मुर्दाबाद, मेड इन चायना बायकॉट, आदी निषेध व्यक्त करणारे स्टेटस आता युवकांच्या मोबाईल फोनवर आहेत. हे स्टेटस फक्त आता प्रत्यक्ष जगण्यात उतरण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Boycott of Chinese goods continues till date, Rajaros sales continue: Shopkeepers' role in not ordering goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.