शिरोळ : येथील पोलीस ठाणे व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बी. जी. माने यांच्यातर्फे निराधार व गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना महामारीत जीवनावश्यक वस्तूंचा आधार मिळाल्याने या कुटुंबियांकडून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार, मदन मधाळे, एस. डी. माने, सुवर्णा गायकवाड, प्रिया कदम यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
अब्दुललाट कोविड सेंटरला मदत
अब्दुललाट : येथे लोकसहभागातून कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरला माजी पंचायत समिती उपसभापती विद्याधर कुलकर्णी व अतुल कुलकर्णी यांच्याकडून पाच हजार रुपये व साहित्याचे वाटप करण्यात आले. या सेंटरला मदतीचा ओघ सुरु आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, डॉ. भूषण यमाटे, मानसिंग भोसले, धन्यकुमार साजणे, मारुती मोहिते, डॉ. ऋषभ चौगुले, रमेश पाटील, प्रशांत आवळे, मिलिंद कुरणे, दादासो पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यड्रावकर फाऊंडेशनकडून मदत
जयसिंगपूर : उदगाव येथील कुंजवन कोविड सेंटर, आगर व सिध्दीविनायक कोविड सेंटरला डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाऊंडेशनकडून फळे व भाजीपाला देण्यात आला. विपुल कोगनोळे, राजकुमार लठ्ठे यांनी भाजीपाला तर उमळवाड येथील विद्युत कर्वे, सचिन भवरे यांनी फळांचे वाटप केले. तसेच उदगाव येथील कुंजवन कोविड सेंटरमध्ये ११ हजार जेवणाचे कंटेनर देण्यात आले. यावेळी अजित उपाध्ये, राहुल बंडगर, अमोल मगदूम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.