शेडापार्क येथे अत्याधुनिक कोरोना केअर सेंटर उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:24 AM2021-05-10T04:24:37+5:302021-05-10T04:24:37+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मृत्यूदर हा दिवसें-दिवस वाढतच चालला असल्यामुळे हा मृत्यूदर नियंत्रणात आणायचा झाल्यास शासकीय महाविद्यालय शेंडा ...

Build a state-of-the-art Corona Care Center at Shedapark | शेडापार्क येथे अत्याधुनिक कोरोना केअर सेंटर उभारा

शेडापार्क येथे अत्याधुनिक कोरोना केअर सेंटर उभारा

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मृत्यूदर हा दिवसें-दिवस वाढतच चालला असल्यामुळे हा मृत्यूदर नियंत्रणात आणायचा झाल्यास शासकीय महाविद्यालय शेंडा पार्क याठिकाणी अत्याधुनिक व्हेंटिलेटरप्रणाली, तसेच हाई फ्लो ऑक्सिजन कॅनोला व बायपेयुक्त २०० खाटांचे अत्याधुनिक कोरोना केअर युनिट युद्धपातळीवर उभे करावे, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

राज्यातील शिवसेना खासदारांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. त्यावेळी खासदार मंडलिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आणि मृत्यूकडे लक्ष वेधताना ही मागणी केली. मंडलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी संवाद साधला.

कोल्हापूर जिल्ह्याला दररोज ५० मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता असताना दररोज ३५ मे. टन इतकाच ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. कर्नाटक राज्यातील बेलारी येथून येणारा ऑक्सिजन हा तांत्रिक अडचणीस्तव थांबला असल्याने त्याचा ताण कोल्हापूर जिल्ह्याला जाणवत आहे. सध्या सी. पी. आर. हॅास्पिटल येथे ४०० ते ५०० कोविड रुग्ण उपचार घेत असून, हॉस्पिटलला दररोज स्वतंत्र १० मे. टन इतका ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, अशी मागणी मंडलिक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

रेमडिसिव्हर इंजेक्शनसंदर्भात जिल्ह्याची दैनंदिन आवश्यकता ४००० इंजेक्शन इतकी असताना निव्वळ २५० इतकेच इंजेक्शन मिळत आहेत. गंभीर रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शनकरिता वणवण फिरावे लागत आहे. याकरिता रेमडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा जास्तीत जास्त व्हावा हीच परिस्थिती लसीकरणाबाबतही असून, दैनंदिन ५० हजार इतक्या डोसची आवश्यकता असताना दोन दिवसांतून २० हजार डोस उपलब्ध होत आहेत. शासकीय दवाखान्यांवर याचा ताण पडत असल्याची माहिती मंडलिक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिली.

-प्रस्ताव पाठवा, मदत करू - मुख्यमंत्री -

दरम्यान, यासंदर्भात मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा जेणेकरून यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही तातडीने करता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार मंडलिक यांना आश्वासन दिले.

Web Title: Build a state-of-the-art Corona Care Center at Shedapark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.