कोल्हापूर- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे आज कोल्हापूरात चीन झेंडा व राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.चीन - भारत या दोन्ही देशांमध्ये सीमेवर जो वाद सुरू आहे, गलवान व्हॅलीमध्ये भारताचे वीस जवान शहिद झाले. जगासमोर कोरोनासारखे मोठे संकट येण्यामागे कम्युनिस्ट विचारसरणीसारखा चीन हा देश आहे. यासर्व घटकांकडे पाहताना अभाविपने आज कोल्हापूरात चीन झेंडा व राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या पुतळ्याचे दहन केले.
यावेळी महानगर सहमंत्री अथर्व स्वामी यांनी कोरोना, चीन, चिनी वस्तु, कम्युनिस्ट या भारतातील चार धोकादायक घटकांबद्दल माहिती देऊन उपस्थित नागरिकांना त्यापासुन लांब राहण्याचे आवाहन केले.कोल्हापूर महानगर मंत्री ऋषिकेश माळी यांनी, देशातील सर्व नागरिक हे भारतीय सैन्यासोबत आहे, असा विश्वास व्यक्त करून स्वदेशी वस्तुच्या वापराचे आवाहन केले. यावेळी समृद्धी उपाध्ये, दिपराज मंडगे, आदेश कांबळे, सोहम कुऱ्हाडे, राहुल बुडके, पूर्वा मोहिते आदि कार्यकर्ते उपस्थित होते.