धुळवडीचा अठरा तळीरामांना दणका, दंड भरुन मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 04:27 PM2019-03-22T16:27:37+5:302019-03-22T16:29:40+5:30

होळी-धुलवडीच्या सणानिमित्त गुरुवारी दिवसभर शहरात दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या अठरा तळीरामांना शहर वाहतुक शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांची दंड भरुन मुक्तता करण्यात आली.

Bust of eighteen pits of smoke | धुळवडीचा अठरा तळीरामांना दणका, दंड भरुन मुक्तता

कोल्हापुरात होळी-धुलवड सणानिमित्त गुरुवारी वाहतुक पोलीसांनी ‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’ मोहिमेअंतर्गत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणी केली.

googlenewsNext
ठळक मुद्देधुळवडीचा अठरा तळीरामांना दणकाशहर वाहतुक शाखेच्या पोलीसांनी घेतले ताब्यात

कोल्हापूर : होळी-धुलवडीच्या सणानिमित्त गुरुवारी दिवसभर शहरात दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या अठरा तळीरामांना शहर वाहतुक शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांची दंड भरुन मुक्तता करण्यात आली.

वाहतुक पोलीसांनी ‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’ मोहिमेअंतर्गत शहरातील शिवाजी फुल, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, सायबर चौक, हॉकी स्टेडियम, लक्षतीर्थ वसाहत, कावळा नाका, क्रशर चौक यासह चौका-चौकांत नाकाबंदी करून, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणी केली. या कारवाईचा तळीरामांसह नियमबाह्य वाहन चालविणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे निदर्शनास आले.

संशयित जिवन विठ्ठल कोकाटे (वय ३५, रा. कनाननगर, नगाळा पार्क), विक्रम राजेंद्र चव्हाण (२५, रा. कदमवाडी), युवराज रामचंद्र सुतार (३७, रा. मंगळवार पेठ), शामराव दत्तु पाटील (५८, रा. पाचगाव, ता. करवीर), संतोष शरणगोंडा पाटील (३५, रा. साईनाथ कॉलनी, कसबा बावडा), विश्वास राजाराम पाटील (३९, रा. पाल खुर्द, ता. राधानगरी), उमेश वसंत पाटील (२८, रा. यवलुज, ता. पन्हाळा), प्रविण साताप्पा कांबळे (३२, रा. जैताळ, ता. करवीर), संजय रावण पाटील (४४, रा. फुलेवाडी), कृष्णात बाबुराव फाले (४०, रा. फुलेवाडी बोंद्रेनगर), राकेश सॅमसन खोबडे (४०, रा. विक्रमनगर), धनंजय विलास आगळे (३१, रा. आरे. ता. करवीर), सुरेश बाळासो गोंधळी (५५, रा. टाकाळा), दौलत शामराव साळवी (४६, रा. वाळोली, ता. पन्हाळा), वरुण राम मार्दती (४८, रा. कोयना कॉलनी, गांधीनगर), उत्तम शामराव कवडे (३४, रा. शिवाजी पेठ) राजु दिलावर पठाण (३१, रा. जवाहरनगर, सरनाईक वसाहत), सुभाष निवृत्ती खेतल (५०, रा. क्रांतीसिंह नाना पाटील नगर) अशी त्यांची नावे आहेत.
 

Web Title: Bust of eighteen pits of smoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.