क्रीडा कार्यालयाच्या गलथान कारभार खेळाडूंचे करीयर धोक्यात

By Admin | Published: May 26, 2017 06:53 PM2017-05-26T18:53:11+5:302017-05-26T18:53:11+5:30

राज्यातील सर्वच क्रीडा कार्यालयाकडून ज्या अत्यधुनिक संगणक पद्धतिचा वापर करावयास पाहिजे तो केला जात नाही.तर आजही पोस्टमनची वाट बघितली जाते

Career threat to the sports ministry | क्रीडा कार्यालयाच्या गलथान कारभार खेळाडूंचे करीयर धोक्यात

क्रीडा कार्यालयाच्या गलथान कारभार खेळाडूंचे करीयर धोक्यात

googlenewsNext

राजेंद्र पाटील /भोगावती : पोटाला चिमटा देऊन करिअरच्या हव्यासापोटी खेळात प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंचे क्रीडा कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे करीयर धोक्यात आले आहे. जिल्हा क्रीडा उपसंचालक कार्यालयातील दप्तर दिरंगाईचा फटका या खेळाडूना बसत आहे.या बाबत कोणतीही संघटना किंवा लोकप्रतिनिधी आवाज उठवायला तयार नाही.तर मुग गिळून गप्प आहेत. देशाचे पंतप्रधान डिजिटल इंडियाची भाषा करत असताना क्रीडा कार्यालय मात्र अजूनही पोस्टमनची वाट पहात बसत आहे. क्रीडा कार्यालयाची अशीच अवस्था राहिली तर खेळाडूना खेळ सोडून लवकरच टाळ घ्यावे लागणार आहेत. क्रीडा उपसंचालक कार्यालयाचा उकिरडा करण्यात शासनाची भूमिका महत्वाची राहिली आहे.ज्या खेळाडूच्या मुळे या कार्यालयांना जळाळी प्राप्त झाली आहे त्याच्या भविष्याचा विसर पडला आहे.जे खेळाडू राज्य,राष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करतात त्यांना मिळालेल्या प्रमाणपत्रांचे पडताळणी करून योग्य दाखला देण्याचे काम या कार्यालयाकडून केले जाते.शासकीय नोकर भरतीत ही पडताळणी सक्तीची आहे. त्यामुळे प्रतेक खेळाडूला या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.कोल्हापूर क्रीडा उपसंचालक कार्यालयात पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची सात-सात महिने शहानिशा होत नाही.तोपर्यंत या कार्यालयाकडे हेलापडे मारण्याचे काम करावे लागते.ज्या ठिकाणी स्पर्धा होतात त्या कार्यालयाकडून माहिती वेळेत दिली जात नाही हे कारण पुढे केले जाते. राज्यातील सर्वच क्रीडा कार्यालयाकडून ज्या अत्यधुनिक संगणक पद्धतिचा वापर करावयास पाहिजे तो केला जात नाही.तर आजही पोस्टमनची वाट बघितली जाते. कोल्हापूर विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यलयाच्या अंतर्गत कोल्हापूर,सांगली,सातारा,सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्याचा समावेश होतो.राज्यात असे कोल्हापूर, लातू१र औरंगाबाद पुणे,अमरावती,नाशिक,नागपूर असे आठ विभागिय कार्यालय आहेत.कोल्हापूर कार्यालयाकडे वरिष्ठ अधिका?्यासह एकूण बारा कमर्चारी नोंद आहेत, बारा पैकी आठ जण येथे कार्यान्वित दिसतात मात्र कार्यलयात हजर तीनच असतात, क्रीडा उपसंचालक हे महत्वाचे पद देखील प्रभारी चालवण्यात आले आहे. सांगलीचे क्रीडा अधिकारी अनिल चोरमले यांच्याकडे चार्ज देण्यात आला आहे. मुख्य लिपिकाची येथून बदली केली आहे.वरिष्ठ लिपिक एकच येथे काम करतात त्याच्या सोबत दोन शिपाई आहेत. लिपिक आठवड्यातून चार दिवस कामासाठी बाहेर असतात.त्यामुळे येथे काम कोणी करायचे हा प्रश्न उरतो. क्रीडा कार्यालयातील हा गलथान कारभार फक्त कोल्हापूरातच नाही तर राज्यातील सर्वच क्रीडा कार्यालयात आहे.यावरून खेळाडूंच्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. चौकट १ खेळाडू हे काय एका दिवसात तयार होत नाहीत,वर्षानुवर्षे ते आपल्या परिस्थितीवर मात करून स्वत:ला घडवण्याचा प्रयत्न करतात व शासकीय नौकरी साठी धडपडत असतात,त्यांच्या करियरला चालना कशी दिली जाईल हे काम क्रीडा कार्यालया कडून होणे आवश्यक आहे. मात्र येथे तर त्यांच्या क्रतुत्वाची चेष्टाच क्रीडा कार्यालयाकडून होत असेल तर खेळाडूंचा अपमान मी सहन करणार नाही,त्याबाबत योग्य ठिकाणी आवाज उठवून खेळाडूना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू तसेच क्रीडा मंत्र्यांशी बोलून या प्रश्नना बाबत आवाज उठवीन असा ठाम विश्वास आम.प्रकाश अबिटकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. चौकट २ क्रीडा कार्यालयाकडून खेळाडूच्या साठी कधीच सहकार्याची भूमिका घेतली जात नाही.उलटा त्यांना मानसिक त्रास अधिक दिला जातो.सर्व पातळीवर मात करत खेळाडू ध्येया कडे वाटचाल करत आसतो,खेळाडूना जेवढे सामाजिक स्थान असते तेवढे क्रीडा खात्याकडून महत्व दिले जात नाही.याबाबत लोकप्रतिनिधी नी आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे.असे मत राष्ट्रीय अंपग जलतरण खेळाडू संभाजी पाटील याने व्यक्त केले आहे. चौकट ३ सध्या एका कोल्हापूर क्रीडा कार्यालयात ५०० प्रस्ताव धूळ खात पडले आहेत. एकीकडे राज्य शासनाची विविध खात्याची भरती सुरु असून या भरतीत उतरलेल्या असख्य खेळाडूना प्रमाणपत्र पडताळणी नसल्याकारणानी घरचा रस्ता बघावा लागला आहे.कोल्हापूरसह राज्यातील हजारो खेळाडूना आपल्या करीयर वर पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते.यासाठी वेळीच दखल घेऊन कायर्वाही होणे आवश्यक आहे.

Web Title: Career threat to the sports ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.