मध्यवर्ती बसस्थानकावर राहणार सीसीटीव्ही ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:43 AM2018-02-12T00:43:39+5:302018-02-12T00:43:42+5:30

CCTV 'Watch' to stay in central bus station | मध्यवर्ती बसस्थानकावर राहणार सीसीटीव्ही ‘वॉच’

मध्यवर्ती बसस्थानकावर राहणार सीसीटीव्ही ‘वॉच’

googlenewsNext



प्रदीप शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बसस्थानकांत घडणाºया प्रत्येक घटनेवर वॉच राहावा, या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने मध्यवर्ती बसस्थानकात सुमारे २० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेºयांमुळे बसस्थानकावरील चोरीसह इतर अनुचित घटनांना आळा बसणार आहे.
बसस्थानक परिसरात प्रवासी, एसटी कर्मचाºयांची दिवसभर गर्दी राहते. बसस्थानकातील वर्दळीचा गैरफायदा घेऊन पाकीटमारी, किरकोळ स्वरूपाच्या चोºया, महिलांची छेडछाड अशा स्वरूपाच्या गुन्हेगारी घटना वाढत आहेत. त्यामुळे येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी प्रवाशांमधून होत होती.
एसटी महामंडळाने राज्यातील जिल्हा स्थळावर असलेल्या बसस्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार येथील बसस्थानकावर सुमारे २० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. कॅमेरे लावण्याचे काम खासगी कंपनीला दिले आहे. कंपनीने बसस्थानक परिसराची पाहणी करून प्राथमिक टप्प्यांवर स्थानिक अधिकाºयांसोबत चर्चा करून कॅमेरे लावण्याची जागा निश्चित केली. यामध्ये फिक्स पोझिशन, पीटीझेड (मूव्हेबल) कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यांचे चित्रीकरण मध्यवर्ती बसस्थानक कक्षात दिसणार आहे.
पाकीटमारी, भुरट्या चोºया...
मध्यवर्ती बसस्थानकांत पाकीटमारी व भुरट्या चोºयांचे प्रमाण वाढले आहे. सीसीटीव्ही या ठिकाणी नसल्याने पाकीटमार व भुरटे चोर मोकाट होते. यासह खासगी बसगाड्यांचे एजंट थेट बसस्थानकांत येऊन प्रवाशांना घेऊन जातात यावर आळा घालण्यासाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात यावा, अशी मागणी होत होती.
सुमारे २५०० बसगाड्यांची ये - जा
मध्यवर्ती बसस्थानकांत दररोज राज्यातून किमान २५०० बसगाड्या चोवीस तासांत ये - जा करीत असतात. यामधून सुमारे ३० हजार प्रवासी बसस्थानकांत येतात व जातात. त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे होते. गर्दीच्या हंगामात नियंत्रण ठेवणे आता शक्य होणार आहे.
रेल्वेस्थानकांवर १४ कॅमेºयांची नजर
रेल्वे स्थानकांवर १४ कॅमेºयांच्या माध्यमातून चोवीस तास पाहणी केली जाते. यामध्ये दोन फिरते कॅमेरे असल्याने लांबपल्यांचे चित्रीकरण होते. या ठिकाणी दररोज नऊ पॅसेंजर व सुपर फास्ट गाड्या ये- जा करतात. यातून सुमारे १५ हजार प्रवासी ये -जा करतात. सीसीटीव्हीमुळे गैरप्रकाराला आळा बसल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सरवदे यांनी सांगितले.

Web Title: CCTV 'Watch' to stay in central bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.