शिवाजी पेठेत सत्यशोधक समाजाचा वर्धापन दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:24 AM2021-09-25T04:24:03+5:302021-09-25T04:24:03+5:30
कोल्हापूर : विवेक वाहिनी व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखेतर्फे शुक्रवारी ‘सत्यशोधक समाज’ वर्धापन दिन शिवाजी पेठेतील उभा ...
कोल्हापूर : विवेक वाहिनी व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखेतर्फे शुक्रवारी ‘सत्यशोधक समाज’ वर्धापन दिन शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक येथे विविध उपक्रमांनी साजरा झाला. अध्यक्षस्थानी अनिसचे अध्यक्ष डॉ. विलासराव पोवार होते.
अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. कायदा सल्लागार अजित चव्हाण यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी चंद्रकांत यादव यांच्यासह विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अनुष्का अर्दाळकर हिने ‘मी सावित्री बोलते’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. डाॅ. छाया पोवार यांनी सर्वांना संविधानाची प्रतिज्ञा दिली. विलासराव पोवार यांनी अध्यक्षीय भाषणात सत्यशोधक चळवळीचा आढावा घेतला.
यावेळी वेशभूषा स्पर्धा झाल्या. शिवशाहीर राजू राऊत यांनी परीक्षण केले. नंदिनी शामराव भंडारे, शिवानी गंगाराम घुरके,रूपाली सिद्धू कात्रट, अनुष्का संजयकुमार अर्दाळकर, स्वरूप स्वप्निल दामुगडे या यशस्वी स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी संयोजक अनिल चव्हाण, सुरेश जत्राटकर, संजय जत्राटकर ,सुजाता पाटील, सौ माने ,, शोभा पाटील, सुनंदा चव्हाण, संजय मिठारी, अस्मिता चव्हाण,जयवंत मिठारी उपस्थित होते.