ताकद दाखविण्याचे आव्हान

By admin | Published: October 2, 2014 12:32 AM2014-10-02T00:32:39+5:302014-10-02T00:38:18+5:30

मतदारांसमोर अनेक पर्याय : सात प्रमुख राजकीय पक्षांचा सहभाग

Challenge of showing strength | ताकद दाखविण्याचे आव्हान

ताकद दाखविण्याचे आव्हान

Next

भारत चव्हाण - कोल्हापूरÈ विधानसभा निवडणुकीत वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी तुटेपर्यंत ताणून धरल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची गणिते बदलली असून, त्याचा परिणाम कोल्हापूर उत्तर मतदारसंघावरही उमटला. आघाडी, युती करून लढणारे आणि एकमेकांवर डरकाळ्या फोडणारे सगळेच राजकीय पक्ष स्वतंत्र लढत असल्याने उमेदवारांच्या तोंडाला चांगलाच फेस येणार आहे. कर्तृत्व, पैशांबरोबरच उमेदवारांचे ‘नशीब’ फॅक्टरही महत्त्वाचा ठरणार आहे.
मतदान यंत्रे उघडेपर्यंत अमूक एक उमेदवार निवडून येईल, याचे भाकित वर्तवणे केवळ अशक्य आहे. कोणीही कितीही मतांची आकडेमोड केली, तसेच मतदारांची विभागणी करून बेरजा केल्या तरीही ‘उत्तर’ कोणाला कळेल, हे सांगता येणे महाकठीण आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे, भाकप, शेकाप असे तब्बल सात पक्ष आपली ताकद अजमावण्यासाठी आखाड्यात उतरले आहेत.
शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी गेल्या पाच वर्षांत विविध आंदोलनांच्या माध्यमातून शहराशी दररोजचा संपर्क ठेवला आहे. टोल, एलबीटीचा प्रश्न असो की, शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असोत, क्षीरसागर यांनी प्रत्येक आंदोलनात हिरीरीने भाग घेतला. परंतु, त्यांच्यासमोर पक्षांतर्गत कुरघोडीची समस्या गंभीर असून, त्यांचा सामना करावाच लागेल. भाजपच्या हुकमी मतांवरही गंडांतर आल्याने त्याचा मोठा फटका त्यांना बसणार आहे.
कॉँग्रेसच्या सत्यजित कदम यांनी पहिल्या दणक्यात उमेदवारी मिळविली. राजकारणासाठी आवश्यक असणारे सर्व गुण त्यांच्याजवळ आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यांनी जोरदार तयारी केली आहे. टोलच्या आंदोलनातून जनतेत मिसळण्याचा प्रयत्न केला. त्यांना काही खडतर अडथळे पार करावे लागतील. त्यांचे नातेवाईक असलेले अमल महाडिक ‘दक्षिण’मधून सतेज पाटील यांच्या विरोधात लढत आहेत. त्याचा फटका कदमांना बसणार हे नक्की!
राष्ट्रवादीचे आर. के. पोवार फेरीवाल्यांचे प्रश्न, टोल आंदोलन याद्वारे ते जनतेत आहेत. केव्हाही कुठेही भेटणे हा त्यांचा स्वभाव आहे. परंतु, त्यांच्याही पक्षात संभाजी देवणे यांनी बंडखोरी केली आहे. पोवार यांना हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक यांची किती, कशी मदत होते यावर भवितव्य आहे. ‘मनसे’ची शहरात फारशी ताकद नसली तरी पक्षाला सुरेश साळोखे यांच्या उमेदवारीचा फायदा होणार आहे. भाजपची पंधरा ते अठरा हजार मते असली तरी महेश जाधव यांना आणखी मतांसाठी प्रयत्न करावे लागणार आहे. आंदोलनाला सर्वांत पुढे असणाऱ्या डाव्या पक्षांना मदत करायला मात्र जनता नेहमी मागे राहिली. त्यामुळे रघुनाथ कांबळे (भाकप), मनीष महागावकर (शेकाप) हे किती मतदान घेतात, हाच उत्सुकतेचा विषय होईल. एकंदरीत सर्व उमेदवार व त्यांच्या पक्षांच्या ताकदीचा विचार करता कोण किती पाण्यात आहे, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.
(अपक्ष उमेदवार : कविराज ऊर्फ साहेबराव काशीद, अनिल ढेरे, महंमदगौस मुल्ला, अमित पावळे, मुश्ताक मुल्ला, रामचंद्र कांबळे.)

नावउत्तर कोल्हापूर
एकूण मतदार २,८0,७६६पक्ष
राजेश क्षीरसागर शिवसेना
सत्यजित कदम काँग्रेस
महेश जाधव भाजप
रघुनाथ कांबळे भाकप
आर. के. पोवार राष्ट्रवादी
श्रीकांत कुंडाप्पाबसप
सुरेश साळोखे मनसे
जगन्नाथ दाभोळे मविआ
मनीष महागावकर शेकाप
अरविंद माने अपक्ष
उदय लाड अपक्ष
संभाजी देवणे अपक्ष

Web Title: Challenge of showing strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.