चंदगडकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही -खा. संजय मंडलिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:44 AM2021-02-21T04:44:10+5:302021-02-21T04:44:10+5:30
चंदगड येथे वाॅर्ड क्रमांक ७ मधील रस्ता शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. राजेश पाटील होते. स्वागत व प्रास्ताविक ...
चंदगड येथे वाॅर्ड क्रमांक ७ मधील रस्ता शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. राजेश पाटील होते.
स्वागत व प्रास्ताविक प्रमोद कांबळे यांनी केले.
आ. राजेश पाटील यांनी चंदगड नगर पंचायतीसाठी मिळालेला पाच कोटी रुपयांच्या निधीचा वापर चंदगड शहरातील सर्वच प्रभागांतील विविध कामांसाठी वापरावा. गट-तट न मानता शहराचा विकास झाला पाहिजे, असे सांगितले. पं.स. सदस्य दयानंद काणेकर यांनी चंदगड शहर व परिसरातील सर्वसामान्य माणसाला आरोग्याचा प्रश्न मोठा सतावत आहे. त्यामुळे येथे आरोग्याच्या सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी केली.
शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, जि.प. सदस्य सचिन बल्लाळ, शिवसेना संघटक संग्रामसिंह कुपेकर, संगयोचे अध्यक्ष प्रवीण वांटगी यांनीही मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला पं.स. सभापती ॲड. अनंत कांबळे, अभय देसाई, विद्याधर गुरबे, भरमाण्णा गावडा, सूरेश कुऱ्हाडे, मुख्याधिकारी अभिजित जगताप, सौ. संज्योती मळवीकर, माजी जि.प. सदस्य बाबूराव हळदणकर, अरुण पिळणकर, सौ. पुष्पाताई नेसरीकर, आदींसह नगरसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते. आभार नगरसेविका प्रज्ञा कांबळे यांनी मानले.
फोटो ओळ:- चंदगड येथे वाॅर्ड क्रमांक ७ मधील पन्नास लाख रुपये विकास निधीतून रस्ता शुभारंभप्रसंगी खा. संजय मंडलिक यांनी संबोधित केले. यावेळी आ. राजेश पाटील, नगराध्यक्ष सौ. काणेकर, नगरसेविका कांबळे आदी उपस्थित होते.