शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
2
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
3
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
4
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
5
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
6
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
7
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
8
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
9
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
10
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
11
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
12
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
13
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
14
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
15
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
16
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
17
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
18
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
19
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
20
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला

शेवटच्या तासाभरात बदलले पक्ष पक्षनिष्ठा बसवली धाब्यावर : अखेरच्या दिवशी

By admin | Published: September 28, 2014 12:55 AM

जिल्ह्यात मजेशीर उलथापालथी; शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरदोन दशकांपूर्वी काळ असा होता की, एकदा एका पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला की, त्याच झेंड्याखाली आयुष्यभराचे राजकारण केले जाई; परंतु काळ बदलला तसा हा कालावधीही बदलला. तो पाच वर्षांपर्यंत आला. मग उमेदवारीसाठी रात्रीत पक्ष बदलल्याचे अनुभवही कोल्हापूरने घेतले; परंतु त्यावरही कडी करत आज काही उमेदवारांनी तासात पक्ष बदलून निष्ठा, स्वाभिमानाच्या चिंधड्या उडवून दिल्या. कागल मतदारसंघातून कालपर्यंत काँग्रेसमधून इच्छुक असलेले परशुराम तावरे आज, शनिवारी दुपारी भाजपमध्ये गेले. विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्याकडूनच त्यांनी उमेदवारी आणली. याच मतदारसंघात काँग्रेसने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, सुरेश कुराडे यांच्याऐवजी गडहिंग्लजचे संतान बारदेस्कर यांना उमेदवारी दिली. संजयबाबांना अप्रत्यक्ष मदत व्हावी, असे राजकारण काँग्रेसने खेळले आहे.चंदगड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संग्राम कुपेकर यांना जनसुराज्य शक्ती पक्षाने आपल्या पदरात घेतले. याच जनसुराज्य शक्ती पक्षाने गेल्या दोन निवडणुकांत स्वर्गीय नेते बाबासाहेब कुपेकर यांना टोकाचा विरोध केला. या मतदारसंघात हे दोन पक्ष एकमेकांविरोधात लढत असताना करवीर मतदारसंघात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने जनसुराज्य शक्तीला ‘बाय’ दिला. तिथे जनसुराज्य-शेकापचे उमेदवार राजू सूर्यवंशी यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघात पक्षाचे कार्यकर्ते धैर्यशील पाटील यांनी अर्ज भरला आहे; परंतु तो पक्षाकडून नव्हे. त्यामुळे या मतदारसंघात ‘घड्याळ’ दिसणार नाही. त्याची भरपाई राधानगरी तालुक्यातील शेकाप राष्ट्रवादीचे आमदार के. पी. पाटील यांना पाठिंबा देऊन करणार आहे.कोल्हापूर दक्षिणमध्ये ‘राष्ट्रवादी’ने आज अचानक दुर्वास कदम यांना उमेदवारी दिली. कदम हे रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) पदाधिकारी आहेत. शिरोळ मतदारसंघातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील आज आपल्याला उमेदवारी मिळत नाही म्हटल्यावर थेट शिवसेनेत गेले. सकाळी प्रवेश व लगेच उमेदवारी घेऊन ते मैदानात उतरले आहेत. सत्त्वशील माने गेल्या चार-पाच महिन्यांत इचलकरंजी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी कोणत्या पक्षाकडे गेले नाहीत, असा एकही पक्ष शिल्लक नाही; परंतु आज अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करण्याची त्यांच्यावर वेळ आली.