फेब्रुवारीतच चटके

By admin | Published: February 24, 2016 12:59 AM2016-02-24T00:59:00+5:302016-02-24T00:59:00+5:30

उन्हाची तीव्रता वाढली : कोल्हापूरचे तापमान ३७ अंश सेल्सिअसवर

Chats in February | फेब्रुवारीतच चटके

फेब्रुवारीतच चटके

Next

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरच्या तापमानात कमालीची वाढ झाली असून पाऱ्याने ३७ अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच अंगाला उन्हाचे चटके बसू लागले आहेत. एप्रिल-मे महिन्यातील उन्हाचा अनुभव आताच येऊ लागल्याने आगामी दोन-तीन महिन्यांत उन्हाची तीव्रता कशी असणार याच्या विचारानेच नागरिकांना धडकी भरली आहे.
आपल्याकडे मार्चच्या अखेरनंतरच तीव्र उन्हाचा सामना करावा लागतो, पण यावर्षी फेबु्रवारीतच उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. सकाळी आठपासूनच सूर्यनारायण आग ओकण्यास सुरुवात करत असल्याने दुपारी बारानंतर घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. गतवर्षी फेबु्रवारी महिन्यात किमान तापमान १६ तर कमाल २८ ते २९ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान राहिले आहे. यंदा परिस्थिती वेगळी आहे, किमान तापमानात वाढ झाली असून २१ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता कोल्हापूर जिल्ह्यात कमाल ३७ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमानाने धडक मारल्याने त्याच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागल्या. दुपारी बारानंतर अंगभर कपडे व तोंडाला कपडा गुंडाळूनच नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडताना दिसत आहेत. काही अपवाद वगळता शहरांतर्गत रस्ते दुपारी तीनपर्यंत निर्मनुष्य दिसत आहेत. ग्रामीण भागात तर वाढत्या उष्म्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून पाण्याअभावी पिके अडचणीत आली आहेत. अनेक वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे स्रोत कमी झाल्याने पाणीटंचाईच्या झळाही सोसाव्या लागत आहेत. तापमानाचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.

Web Title: Chats in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.