शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
2
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
3
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
4
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
5
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
6
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
7
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
8
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
9
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
10
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
11
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
12
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
13
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
14
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
15
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
16
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
17
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
18
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
19
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
20
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"

फेब्रुवारीतच चटके

By admin | Published: February 24, 2016 12:59 AM

उन्हाची तीव्रता वाढली : कोल्हापूरचे तापमान ३७ अंश सेल्सिअसवर

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरच्या तापमानात कमालीची वाढ झाली असून पाऱ्याने ३७ अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच अंगाला उन्हाचे चटके बसू लागले आहेत. एप्रिल-मे महिन्यातील उन्हाचा अनुभव आताच येऊ लागल्याने आगामी दोन-तीन महिन्यांत उन्हाची तीव्रता कशी असणार याच्या विचारानेच नागरिकांना धडकी भरली आहे. आपल्याकडे मार्चच्या अखेरनंतरच तीव्र उन्हाचा सामना करावा लागतो, पण यावर्षी फेबु्रवारीतच उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. सकाळी आठपासूनच सूर्यनारायण आग ओकण्यास सुरुवात करत असल्याने दुपारी बारानंतर घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. गतवर्षी फेबु्रवारी महिन्यात किमान तापमान १६ तर कमाल २८ ते २९ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान राहिले आहे. यंदा परिस्थिती वेगळी आहे, किमान तापमानात वाढ झाली असून २१ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता कोल्हापूर जिल्ह्यात कमाल ३७ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमानाने धडक मारल्याने त्याच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागल्या. दुपारी बारानंतर अंगभर कपडे व तोंडाला कपडा गुंडाळूनच नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडताना दिसत आहेत. काही अपवाद वगळता शहरांतर्गत रस्ते दुपारी तीनपर्यंत निर्मनुष्य दिसत आहेत. ग्रामीण भागात तर वाढत्या उष्म्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून पाण्याअभावी पिके अडचणीत आली आहेत. अनेक वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे स्रोत कमी झाल्याने पाणीटंचाईच्या झळाही सोसाव्या लागत आहेत. तापमानाचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.