कागल : येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीच्या यात्रेनिमित्त संयुक्त हणबर समाज मित्र मंडळाने घेतलेल्या कुस्ती मैदानात इचलकरंजीच्या बाळू पुजारीने पोकळ घिस्सा डावावर शाहू साखर कारखान्याचा मानधनधारक पैलवान अकुंश ढाकवाले याच्यावर विजय मिळविला. तर अर्जूननगरच्या उदयराज पाटील याने एकलिंगी डावावर सचिन पाटील (वारणा) बाणगे येथील अरुण बोंगार्डे याने हप्ते डावावर अमित कांबळे (काळाइमाम तालीम) याच्यावर इचलकरंजीच्या ओंकार भातमारे याने झोळी डावावर भैरू माने (काळाइमाम तालीम) यांच्यावर मात केली. कुस्त्या पाहण्यासाठी मैदानात मोठी गर्दी झाली होती. येथील मिनी खासबाग मैदान यशवंत किल्ला येथे झालेल्या या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तर सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत गवळी, जिल्हा बॅँकेचे संचालक भय्या माने, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नगरसेवक बाबासो नाईक, आनंदा पसारे, सौरभ पाटील, सुधाकर सोनुर्ले, नेताजी मोरे, जितेंद्र व्याकुडे, शिवाजी भगले, संजय भुरले, राजेंद्र भुरले, माजी नगराध्यक्ष यशवंत गुरव, वीरेश खापरे, सचिन मठूरे, आदी मान्यवर उपस्थित होते. या मैदानात लहान-मोठ्या मिळून १८१ कुस्त्या झाल्या. सतीश कुंभार, सौरभ वाडकर, रोहित चौगुले, तेजस पाटील, वैभव मगदूम, सचिन मठुरे, निलेश हिरूगडे, अवधूत चौगुले, अतुल डावरे, शशिकांत बोंगार्डे, सचिन कदम, कुबेर पुजारी, आदींनी लक्षवेधी कुस्त्या केल्या. पंच म्हणून मारुती पोवार, शिवाजी जमनिक, शिवाजी माळकर, शंकर कदम, बाळू कवडे, आप्पा निकम, चंद्रकांत वाडकर, कुमार पाटील यांनी, तर राजाराम चौगुले यांनी निवेदन केले.या कुस्तीकडेही लक्ष...निवेदन करताना राजाराम चौगुले म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय कुस्ती घडविण्यात माहीर समजले जाणारे आमदार हसन मुश्रीफ हे आता या मैदानी कुस्त्याकडेही लक्ष देत आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना कुस्तीकलेसाठी भरीव योगदान सध्या देत आहे. उत्तरोत्तर हे योगदान वाढत जाईल. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
पुजारीकडून ढाकवाले चितपट
By admin | Published: March 15, 2017 12:16 AM