कोल्हापूर : गणेशोत्सव व मोहरम हे दोन्हीही उत्सव एकाच वेळी असल्याने पोलीस प्रशासनावर दुहेरी जबाबदारी आहे. मोहरममध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. पंजे भेटीसाठी बाहेर काढण्यात येऊ नयेत. कोणत्याही मिरवणुकीला यंदा परवानगी मिळणार नाही अशा स्पष्ट सूचना शहर उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी पीर-पंजे स्थापना करणाऱ्या मंडळांना केल्या. बैठकीस लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध तालीम संस्था, तरुण मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.मोहरम उत्सवाला दि. २१ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. कोरोना संकटात कोठेही गर्दी होणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासन घेत आहे. यंदाच्या वर्षी मोहरममधील पंजे भेटींना पोलीस प्रशासन परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले. खाई फोडणे विधी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, पंजे विसर्जन जागीच करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. बैठकीत, पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्यावर मंडळांचेही एकमत झाले.बैठकीला ओंकार शिंदे, सचिन पंडत, जहांगीर पंडत, प्रवीण डोंगरे, साईश परमाळे, रवी कोवाडकर, पिंटू परमाळे, अनंत सरनाईक, दशरथ भोसले, परवेज जमादार, सिद्धेश सावंत, केदार खवरे, महेश कदम, विशाल साळोखे, शांताराम इंगवले, रोहित पंडत, आदी उपस्थित होते.
मोहरममध्ये पंजे भेट, मिरवणुकीवर पोलिसांचे निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 1:21 PM
गणेशोत्सव व मोहरम हे दोन्हीही उत्सव एकाच वेळी असल्याने पोलीस प्रशासनावर दुहेरी जबाबदारी आहे. मोहरममध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. पंजे भेटीसाठी बाहेर काढण्यात येऊ नयेत. कोणत्याही मिरवणुकीला यंदा परवानगी मिळणार नाही अशा स्पष्ट सूचना शहर उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी पीर-पंजे स्थापना करणाऱ्या मंडळांना केल्या.
ठळक मुद्देमोहरममध्ये पंजे भेट, मिरवणुकीवर पोलिसांचे निर्बंधशहर पोलीस उपअधीक्षक : गर्दी करू नये; पीर-पंजे स्थापना मंडळांना सूचना